पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्ध च। मर्पितमनोवुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥७॥ अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना । परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचितयन् ॥ ८॥ कालच्या यातत सीच भावना होणे शक्य नाही. म्हणून आमरणान्त म्हणजे सर्व आयुष्यभर परमेश्वराचे ध्यान करणे जरूर आहे (वे. सू. (४.१.१२ ), या सिद्धान्ताला अनुसरून भगवान् अर्जुनास असे सांगतात की--] (७) म्हणून सव काली म्हणजे नेहमीच माझे स्मरण करीत जा, आणि युद्ध कर. माझ्या ठायीं मन व बुद्धि अर्पण केलीस ह्मणजे (लढाई करूनह) मलाच येऊन पाँचशील, यांत संशय नाही. (८) हे पार्था ! चित्त दुसरीकडे जाऊ न देतां अभ्यासाच्या साहाय्याने स्थिर करून दिव्य परमपुरुषाचे ध्यान करीत असले म्हणजे स्थाच पुरुषास जाऊन पाँचतो. भगवतीतेत संसार सोडन केवळ भक्तिच प्रतिपाद्य आहे असे झणणारांनी सातव्या श्लोकांतील सिद्धान्ताकडे अवश्य लक्ष पुरवावे. मोक्ष मिळणे तो परमेश्वराच्या ज्ञानयुक्त भक्तीने मिळतो व मरणसमयों देखील तीच भावना कायम रहाण्यास जन्मभर तोच अभ्यास पाहिजे द विर्विवाद आहे. पण त्यासाठी कम सोडिली पाहिजेत असा गीतेचा अभिप्राय नाहीं: उलट भगवद्भत्ताने ही स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेली सर्व कर्मे निष्काम बुद्धीने केलीच पाहिजेत असा गीताशा- स्त्राचा सिद्धान्त आहे, व तोच "माझें नेहमी चिंतन कर, आणि युद्ध कर" या शब्दांनी व्यक्त केला आहे. असो; अंतकाली देखील दिव्य परमपुरुषाचे जे चिसन करावयाचें तें परमेश्वरार्पणबुद्धीने जन्मभर निष्काम कर्म करणारे कर्मयोगी कोणत्या प्रकारें करितात, याचे आतां वर्णन करितात-]