पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १९१ एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥ २६॥ 55 नेते सृती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन । तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ २७ ॥ वेदेषु यथेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् । येतो. (२६) याप्रमाणे शुक्ल व कृष्ण म्हणजे प्रकाशमय व अंधकारमय अशा जगताच्या दोन शाश्वत गति म्हणजे कायमचे मार्ग मानिले आहेत. एका मार्गाने गेले म्हणजे परत फिरत नाही, व दुसन्याने पुनः परत येतो. [ या दोन गतीस देवयान (शुक्ल) व पितृयाण (कृष्ण), किंवा अचिरादि मार्ग आणि धम्रादि मार्ग, अशी उपनिषदांतून नावे असून ऋग्वेदांतहि या मार्गाचा उल्लेख केलेला आहे. मेलेल्या मनुष्याच्या देहास अग्नि दिल्यानंतर म्हणजे अग्नी पासूनच या दोन्ही मार्गास सुरु- वात होते; म्हणून पंचविसाव्या श्लोकांत · अग्नि' हे पद पूर्वीच्या श्लोकांतून अध्याहृत घेतले पाहिजे. पूर्वीच्या श्लोकांत वर्णिलेल्या मार्गात व दुसऱ्या मार्गात भेद को होतो तेवढेच सांगण्याचा पंचविसाम्या श्लोकाचा हेतु असल्यामुळे 'अग्नि' या शब्दाची पुनरावृत्ति त्यांत केलेली नाही. यासंबंधाने जास्त माहिती गीतारहस्याच्या दहाव्या प्रक- रणाचे अखेर (पृ. २९२-२९५) दिली आहे ती पहा. त्यावरून वरील श्लोकाचा भावार्थ स्पष्ट कळून येईल. आता या दोन मार्गातील तब ओळखिल्याने काय फल मिळते ते सांगतात-] (२७) हे पार्था ! या दोन सृति म्हणजे मार्ग (तस्वतः) जाणणारा कोणताहि (कर्म-) योगी मोह पावत नाही; म्हणून हे अर्जुना ! तूं सर्वकाल (कर्म-) योगयुक्त हो. (२८) हें ( वर सांगितलेले तस्व) जाणिलें म्हणजे वेदांमध्ये, यशामध्ये, तपामध्ये आणि दानामध्ये में पुण्यफल सांगितले आहे