पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ९. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः । वेद्यं पवित्रमोकार ऋक् साम यजुरेव च ॥ १७ ॥ गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् । प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८ ॥ तपाम्यहमहं वर्ष निगृह्णाम्युत्नृजामि च । अमृतं चैव मृत्युश्च सदसञ्चाहमर्जुन ॥ १९ ॥ पासून (यज्ञार्थ) उत्पन्न झालेले अन्न मी, (यहांत हवन करितांना म्हण- तात ते) मंत्र मी, तूप मी, अग्नि मी, आणि (अग्नीत टाकिलेल्या) आहुति मीच. ऋतु व यज्ञ हेदोन शब्द मूळांत समानार्थकच आहेत. पण 'यज्ञ' शब्दाचा अर्थ पुढे व्यापक होऊन देवपूजा, वैश्वदेव, अतिथि- संतर्पण, प्राणायाम, जप इत्यादि कर्मासहि 'यज्ञ' हीच संज्ञा ज्याप्रमाण प्राप्त झाली (गी. ४.२३-३०), त्याप्रमाणे 'क्रतु' शब्दाचा अर्थ वाढत गेलेला नाही. नीतधर्मात अश्वमेधादि ज्या यज्ञास हा शब्द लाविलेला आहे तोच त्याचा अर्थ पुढेहि कायम राहिला आहे. म्हणून या ठिकाणी 'ऋतु' शब्दाने 'श्रीत' यज्ञ व 'यज्ञ' शब्दाने 'स्मात' यज्ञ समाजाचे, असें शांकरभाष्यांत म्हटले आहे; व तोच अर्थ आम्ही वर दिला आहे. कारण असा भेद न केला तर 'ऋतु' व 'यज्ञ' हे शब्द समानार्थक होऊन या श्लोकांत त्यांची निष्कारण द्विरुक्ति केल्याचा दोष येतो.] (1७) या जगताचा पिता, माता, धाता (आधार), पितामह (आजा) मी, जे काय पवित्र किंवा जे काही क्षेय आहे ते आणि कार, ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेदहि मी, (16) (सर्वाची) गति, (सर्वांचा) पोषक, प्रभु, साक्षी, निवास, शरण, सखा, उत्पत्ति, प्रलय, स्थिति, निधान आणि अव्यय बीजहि मी. (११) मी ऊन पादितों, मी पाऊस