पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अभ्याय ९. २०१ ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥२०॥ ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयोधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१ ॥ 'सत्' आणि 'असत् ' हे दोन्ही शब्द एकदम योजिले म्हणजे स्यांत श्य सृष्टि व परब्रह्म या दोहोंचाहि एकत्र समावेश होतो, हे उघड आहे. म्हणून परिभाषेच्या भेदाने तुम्ही कोणालाहि 'सत्' व कोणालाहि 'असत्' म्हटले तरी दोन्ही परमेश्वराचींच रूपे आहेत असें दाखविण्यासाठी 'सत्' आणि ' असत' या शब्झच्या व्याख्या न देतां 'सत्' आणि 'असत् ' मीच असें मोघम वर्णन केले आहे, असाहि या वर्णनाचा भावार्थ काढितां येईल (गी. ११.३७. ब १३.१२ पहा ). परमेश्वराची रूपे जरी याप्रमाणे अनेक असली तरी त्यांची एकत्वाने उपासना करण व अनेकस्याने उपासना करणे यांतील भेद काय हे आता सांगतात-] (२०) विद्य म्हणजे ऋक, यजु व साम या तीन वेदांतील कमें करणारे जे सोमपि म्ह. सोमयाजी व निष्पाप (पुरुष) माझे यज्ञानें पूजन करून स्वर्गलोकप्राप्तीची इच्छा करितात, ते इंद्राच्या पुण्यलोकास पोचून स्वर्गात देवांचे अनेक दिव्य भोग उपभोगितात. (२१) आणि स्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याचा क्षय झाल्यावर ते पुनः जन्म घेउन मृत्युलोकी येतात. अशा प्रकारे त्रयी धर्म म्हणजे तीन वेदांतील यज्ञयागादि श्रीतधर्म पाळणाच्या व काम्य उपभोगाची इच्छा ठेवणाच्या लोकांस ( स्वर्गाच्या) येरजान्या प्राप्त होतात. । [यज्ञयागादि धर्म किंवा नाना प्रकारच्या देवतांचे आराधन यांनी काही काळ स्वर्गवास झाला तरी पुण्यांश सरल्यावर पुनः जन्म घेऊन भूलोकी यावे लागते हा सिद्धान्त पूर्वी पुष्कळदा आला आहे (गी. २. ४२-४४४.३४, ६.४१७.२३,८,१६व ३५). मोक्ष अशा प्रकारचा