पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १. २०९ अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३॥ (३३) मग जे पुण्यवान ब्राह्मण, तसेच राजर्षि (क्षत्रिय), माझे भक्त आहेत स्यांची गोष्ट कशास पाहिजे ? या अनित्य व असुख म्हणजे दुःखकारक (मृत्यु) लोकीं तूं आहेस म्हणून मला भज. [३२ व्या श्लोकांत पापयोनि' असा जो शब्द आहे तो स्वतंत्र न मा- 'नितांनिया, वैश्य व शूद्र यांसहि लागू पडतो, कारण पूर्वी काही तरी पाप असे केले असल्याखेरीज स्त्री-वैश्य-शूद्रांच्या जन्मास कोणीहि येत नाही, असे कित्येक टीकाकारांनी म्हटले आहे. त्यांच्या मते पापयोनि हा सामान्य शब्द असून स्त्री, वैश्य, शूद हे त्याचे भेद उदाहरणार्थ दिलेले आहेत. पण आमच्या मते हा अर्थ बरोबर नाही. पापयोनि शब्दाने अलीकडे सरकार दरबारांत ज्यांना गुन्हेगार जाती' असे म्हणतात तशा प्रकारचा अर्थ विवक्षित असून, त्या जातींतील लोकां. नाहि भगवद्भकाने सिद्धि मिळत्ये अक्षा या श्लोकांतील सिद्धान्त आहे. स्त्री, वैश्य, शूद या वर्गातले नसून त्यांना मोक्ष प्राप्त होण्यास जी हरकत आहे ती वेदश्रवणास से अनधिकारी आहेत झणून आलेली आहे; आणि झणूनच भागवत पुराणांत- स्त्रीशुदाद्वज बंधूनां त्रयीन श्रुतिगोचरा । कर्मश्रेयसि मूहानां श्रेय एवं भवेदिह । इनि भारतमाख्यानं कृपया मुनिना कृतम् ।। "स्त्रिया शूद्ध किंवा कलियुगांतील नामधारी ब्राह्मण यांच्या कानी बंद पडत नसल्यामुळे ते मूढ राहूं नयेत म्हणून व्यासमुनीने कृपाळु होऊन महाभारत- अर्थात् गीताहि-मुद्दाम त्यांच्या कल्याणार्थ रचिले" असे म्हटले आहे (भाग. १.४.२५), भगवीतेतले वरील श्लोक थोड्या पाठ. । भेदाने अनुगीततहि आलेले आहेत (म. भा. अश्व, १९.६१,१२), जा- तीचा, वर्णाचा, स्त्रीपुरुषादिकांचा किंवा काळ्या गोच्या रंगाचा गरे गी.१३