पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १०. १५ सोऽविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७॥ , आता ' पूर्वांचे चार' हे मनूचे विशेषण मानून जो अर्थ कित्येकांनी लाविला आहे तो कितपत सयुक्तिक ठरतो ते पाहूं. एकंदर मन्वंतरें चवदा आणि या चवदांचे चवदा मनु असून त्यांत सातसासांचे दोन वर्ग आहेत. पहिल्या सातांची नौवें स्वायंभुव, स्वारीचिष, औत्तमी तामस, रैवत, चाक्षुष आणि वैवस्वत अशी असून यांस स्वायंभुवादि मनु असे म्हणतात (मनु. १.६२ व ६१) यांपैकी सहा मनु संपून हल्ली सातवा म्हणजे वैवस्वत चालू आहे. हा संपला म्हणजे यापुढे जे सात मनु येणार { भाग. ८.१३.७) त्यांस सावणि मन अशी संज्ञा ' आहे त्यांची नांवें सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि धर्म सावर्णि. रुद्र- सावणि, देवसावर्णि व इंद्रसावणि अशी आहेत (विष्णु. ३.२; भागवत ८.१३ हरिवंश. १.७). मनु याप्रमाणे प्रत्येकी सात सात असतो कोणत्याहि वर्गातील 'पूर्वीचे' म्हणजे पहिले 'चार'च गीतेत का विवक्षित असावे याचे काही कारण सांगता येत नाही. सावर्णि मनूं. पैकी पहिला मन सोडन पुढील चार म्हणजे दक्ष-ब्रह्म-धर्म-ख रुद्रसावर्णि हे एकाच काली उत्पन्न झाले अशी जी ब्रह्मांउपुराणांत (४.१) कथा आहे त्यावरून हे चार सावर्णि मनुच गीतेत विवक्षित आहेत असे कित्येकांचे ह्मणणे आहे. पण यावर दुसरा असा आक्षेप येतो की, सावणि मन हे सर्व पुढे होणारे असल्यामुळे "ज्याच्यापा- सून या लोकांमध्ये ही प्रजा झाली" हे भूतकालदर्शक पुढील वाक्य भावी सावर्णि मनूप लावितां येत नाही, एतावता 'पूर्वांचे चार" शब्दांचा संबंध 'मनु' या पदाशी जोडणे युक्त होत नाही. म्हणून 'पूर्वीचे चार' हे दोन्ही शब्द स्वतंत्ररीत्या पूर्वीच्या कोणत्या सरी चार चार ऋषींना किंवा पुरुषांना अनुलक्षून आहेत असें म्हणावे लागतें- आणि असे म्हटले म्हण ने पूर्वीचे चार कोणते हा प्रश्न सहजच उप- स्थित होतो. ज्या टीकाकारांनी या श्लोकाचा अर्थ लाविला आहे