पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अथवा बाहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥४२॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन- संवादे विभूतियोगा नाम दशमोऽध्यायः ॥ १०॥ सी ती माझ्या तेजाच्या अंशापासून झाली आहे असेंच तूं समज. (४२) अथवा हे अर्जुना ! तुला हा पसारा जाणून काय करावयाचे ? (थोडकर सांगतो की,) मी आपल्या एका(च) अंशाने हे सर्व जग व्यापून जाहिलो आहे. 1 [शवटला श्लोक “पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि" या पुरुषसूक्तांतील ऋचेच्या (ऋ. १०.९०,३) आधारे सांगितला असून, हा मंत्र छांदोग्योपनिषदांतहि (छो. ३.१२.६) आला आहे. 'अंश' या शब्दाच्या अर्थाचा खुलासा गीतारहस्याच्या ९ व्या प्रक- रणाच्या अखेर (पृ २४३ व २४४) केला आहे तो पहा. भगवान् आपल्या एकाच अंशाने हे जग जर व्यापून राहिले आहेत तर याच्या- पेक्षा भगवंतांचा एकंदर महिमा पुष्कळच अधिक असला पाहिजे है उघड आहे; व ते सांगण्याच्या हेतूनेच शेवटला श्लोक सांगितला आहे. पुरुषसूक्तांत तर "एतावान् अस्य महिमाऽतो ज्यायांश्च पूरुषः" हा एक्ला याचा महिमा झाला, यापेक्षा पुरुष श्रेष्ठ आहे-असें सष्टच सांगितले आहे.] याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग---म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील विभूतीयोग नांवाचा दहावा अध्याय समाप्त झाला.