पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१. श्रीमद्भगवद्गीता. - - - - - - - - - - - श्रीभगवानुवाच । 5; पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः। नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ५॥ सातव्या अध्यायांत ज्ञानविज्ञान सांगण्यास सुरवात करून सात. व्यांत व आठव्यांत परमेश्वराच्या अक्षर किंवा अव्यक्त रूपाचे, आणि नवव्यांत व दहाव्यांत अनेक व्यक्त रूपांचे, जे ज्ञान सांगितले, त्यासच अध्यात्म' ही संज्ञा अर्जुनाने पहिल्या श्लोकांत दिली आहे; आणि एका अध्यक्तापासून अनेक व्यक्त पदार्थ कसे निर्माण होतात याचे सातव्या (७.४-१५), आठव्या (८.१६-२१) व नवघ्या (१.४-८) अध्यायांत जें वर्णन आहे तेच 'भूतांची उत्पत्ति व लय' या शब्दांनी दुसन्या श्लोकांत अभिप्रेत आहे. तिसऱ्या श्लोकाची दोन अर्धे ही दोन निरनिराळी वाक्ये कल्पून त्यांचा "हे परमेश्वरा ! तुम्ही आपले जे (स्वरूप) वर्णन केले ते खरे आहे (म्हणजे मी समजलों); आतां हे पुरुषोत्तमा ! मी तुमचे ईश्वरी स्वरूप पाइच्छितो." असा अर्थ करीत असतात (गी. १०.१४ पहा). परंत । दोन्ही प्रक्ति मिळून एकच वाक्य मानणे बरे दिसते, व परमार्थप्रपा टीकेत तसे केलेंहि आहे. चवथ्या सेवांत 'योगेश्वर' असा जो शब्द आहे त्याचा अर्थ ' योगांचा (योग्यांचा नरह) ईश्वर' असा आहे (गी. १८.७५). योग म्हणजे अध्यक्त रूपापासन व्यक्त सष्टि निर्माण कर- ण्याचे सामर्थ्य किंवा युक्ति असा अर्थ पूर्वी (गी. ७.२५ व २.५) दिला असून स्या सामथ्यानेच विश्वरूप दाखवावयाचे असल्यामुळे 'योगेश्वर' हे संबोधन येथे सहेतुक योजिलेले दिसते.] श्रीभगवान् म्हणाले--(५) है पार्था ! माझी अनेक प्रकारची आणि अनेक रंगांची व आकारांची (ही) शेंकडों अथवा हजारों विश्य रूमें पहा.