पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १. २३५ प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत ।। १४ ॥ अर्जुन उवाच । FS पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् । ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषीश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ॥ १५॥ अनेकवाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम् । नांतं न मध्यं न पुनस्तवादि पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप ।। १६ ॥ किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमंतम् ।। पश्यामि त्वां दुनिरीक्ष्यं समंताद्दीप्तानलार्क द्युतिमप्रमेयम् ॥ १७ ॥ त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् । त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ १८॥ अनादिमध्यांतमतवीर्यमनंतबाहुं शशिसूर्यनेत्रम् । पश्यामि त्वां दीक्षहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥१९॥ अर्जुन म्हणाला-(१५) हे देवा ! तुमच्या या देहांत सर्व देव आणि नानाप्रकारच्या भूतांचे समुदाय, तसेंच कमलासनावर बसलेला (सर्व देवांचा) स्वामी ब्रह्मदेव, सर्व ऋषि, आणि (वासुकि आदिकरून) सर्व दिव्य सहि मला दिसत आहेत. (१६) अनेक बाहु, अनेक उदरे, अनेक तोडे व अनेक नेत्र असणा-या, अनंतरूपी तुम्हालाच मी चोहोंकडे पहातो; पण हे विश्वे- श्वरा विश्वरूपा ! तुमचा ना अंत, ना मध्य, किंवा ना आदिहि मला (कोठेहि) दिसत नाही. (७) किरीट, गदा व चक्र धारण करणारे, चोहोकडे प्रभा फांकलेले, तेजःपुंज, रखरखीत, अग्निसूर्याप्रमाणे दैदीप्यमान, डोळ्यांनी पहाण्यासहि अशक्य आणि अपरंपार (भरलेले) असे तम्हीच मला जिकडेतिकडे दिसत आहा. (१८) तुम्हीच अखेरचे ज्ञेय अक्षर (ब्रह्म) तुम्हीच या विश्वाचे शेवटचे आधार, तुम्हीच अव्यय असून शाश्वत धर्माचे रक्षक, आणि सनातम पुरुष तुम्ही, असे मला वाटते. (१९) आदि, मध्य