पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १३. २५७ त्रयोदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच । इदं शरीरं कौतेय क्षेत्रमित्यभिधीयते। केले, परंतु सातव्या अध्यायांत जे ज्ञानविज्ञान सांगण्यास सुरुवात केली ते एवढ्यानेच संपत नाही. परमेश्वराचे पूर्ण ज्ञान होण्यास बाह्य सृष्टीच्या क्षराक्षरविचाराबरोबरच मनुष्याचे शरीर आणि आत्मा, किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, यांचाहि विचार करावा लागतो. तसेच जड प्रकृतीपासून सर्व व्यक्त पदार्थ निर्माण होतात असे जरी सामान्यत. कळले तरी प्रकृतीच्या कोणत्या गुणामुळे हा विस्तार होतो व त्याचा क्रम काय हे सांगितल्याखेरीज ज्ञान- विज्ञानाचे निरूपण पूर्ण होत नाही. म्हणून तेराव्या अध्यायांत प्रथम क्षेत्र- क्षेत्रज्ञाविचार व पुढे चार अध्यायांत गुणत्रयविभाग सांगून अठराव्या अध्या. यांत एकंदर सर्व विषयाचा उपसंहार केला आहे. सारांश तृतीय पध्यायी ही स्वतंत्र नसून कर्मयोगसिद्ध धर्थ ज्या ज्ञानविज्ञानाच्या निरूपणास सातव्या अध्यायांत सुरुवात झाली त्याचीच पूर्तता या पध्यायींत केली आहे. गीतारहस्य प्र.१४ पृ.४५७-४५९ पहा. गीतेच्या कित्येक प्रतीत या तेराव्या अध्यायाच्या आरंभी "अर्जुन उवाच-प्रकृति पुरुषं चैव क्षेत्र क्षेत्रज्ञमेव च । एतद्वेदितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव ॥" असा श्लोक दिलेला असतो; व त्याचा अर्थ अर्जुन म्हणाला, मला प्रकृति, पुरुष, क्षेत्र क्षेत्रज्ञ. ज्ञान व ज्ञेय म्हणजे काय ते जाणण्याची इच्छा आहे, म्हणून मला ते सांगा" असा आहे. पण क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार गीतेत कसा आला हे न कळ. ल्यामुळे कोणी तरी हा श्लोक येथे मागाहून घुसडून दिला आहे असें स' दिसून येते. टीकाकार हा शोक प्रक्षिप्त मानितात; व तसे न केल्यास तितील श्लोकांची संख्याहि सातशेपेक्षा एक अधिक होते. म्हणून आम्ही हि हा श्लोक प्रक्षिप्त समजून शांकरभाष्याप्रमाणे या अध्यायाचा आरंभ केला आहे.] गी. र. १६