पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. पतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १॥ क्षेत्रशं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत । क्षेत्रक्षेत्रायोनिं यत्तानं मतं मम ।। २॥ श्रीभगवान् म्हणाले-(१) हे कौनेया! या शरीरासच क्षेत्र असें म्हटले आहे. हे (शरीर) जो जाणितो त्यास क्षेत्रज्ञ असें तद्विद म्हणजे या शास्त्रांतील ज्ञाते पुरुष म्हणतात. (२)सर्व क्षेत्रांमध्ये हे भारता! क्षेत्रज्ञ सुद्धां मीच असे समज. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे ज्ञान तेच माझे (परमे श्वराचे) ज्ञान मानिले आहे.

[पहिल्या श्लोकांत 'क्षेत्र' व 'क्षत्रज्ञ' या दोन शब्दांचे अर्थ

दिले आहेत; व दुस-या श्लोकांत क्षेत्रज्ञ म्हणजे मी परमेश्वर, किंवा जें पिढी तेंच ब्रह्मांडी, असे क्षेत्रज्ञाचे स्वरूप सांगितले आहे. दुसऱ्या श्लोकांतील चापि सुद्धा या शब्दांचा क्षेत्रज्ञच नव्हे तर क्षत्र देखील मीच आहे असा अर्थ होतो. कारण, क्षेत्र किंवा शरीर ज्या पंचमहा- भूतांचे बनते ती प्रकृतीपासून झालेली असून प्रकृति परमेश्वराचीच कनिष्ठ विभूति आहे, हे सातव्या व आठव्या अध्यायांत वणिले आहे (७. ४८.४६९८ पहा). क्षेत्र किंवा शरीर अशा रीतीने पंनमहाभूतांचें झालेले असल्यामुळे क्षराक्षरविचारांत ज्याला क्षर म्हणतात त्या वर्या- तच क्षेत्राचा समावेश होतो; आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच परमेश्वर होय. एतावता क्षराक्षरविचाराप्रमाणेच क्षेत्रक्षेत्रज्ञविचारहि परमेश्वराच्या ज्ञानाचा एक भाग बनतो (गीतार. पृ. १४१-१४६ पहा.), आणि हाच अभिप्राय मनांत आणून दुसन्या श्लोकाचे अखेर " क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे ज्ञान तेच माझं ह्मणजे परमेश्वराचे ज्ञान " हे वाक्य आले आहे. ज्यांना अद्वैत वेदान्त कबूल नाही त्यांना "क्षेत्रज्ञ सुद्धा मीच" या वाक्याची ओढाताण करावी लागून 'क्षेत्रज्ञ' व 'मी परमेश्वर' । यांचा अभेदभाव या वाक्याने दाखविला जात नाही असे प्रतिपादन - - - - -. .