पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ श्रीमद्भगवद्गीता. $$ प्रकृति पुरुषं चैव विद्धथनादी उभावपि । विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभधान् ॥ १९ ॥ कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते । पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ २०॥ (१९) प्रकृति व पुरुष ही दोन्हीहि अनादि असे समज. विकार व गुण हे सर्व प्रकृतीपासून उद्भवतात असें जाण, 1 [सांख्यशास्त्राप्रमाणे प्रकृति व पुरुष हे दोन्ही अनादिच नव्हे तर स्वतंत्र व स्वयंभूहि आहेत, वेदान्ती प्रकृति परमेश्वरापासून उत्पन्न झालेली, अतएव स्वयंभू नाही आणि स्वतंत्रहि नाही असे समजतात (भी. ४. ५, ६). पण प्रकृति परमेश्वरापासून केव्हां निघाली ते सांगता येत नसल्यामुळे, व पुरुष (जीव) हा परमेश्वराचाच अंश (गी.१५.७) असल्यामुळे दोन्ही अनादि आहेत एवढे वेदान्त्यांस मान्य आहे. यासंबंधाचा जास्त खुलासा गीतारहस्य पृ. विशेषतः पृ. १५९-१६४ आणि प्र. १० पृ. २५९-२६२ यांत केला आहे तो पहा.] (२०) कार्य म्हणजे देह, व कारण म्हणजे इंद्रिये, यांच्या कर्तृत्वास प्रकृति कारण आहे असे म्हणतात; आणि (कर्ता नसूनहि) सुखदुःखाचा उपभोग घेण्यास पुरुष (क्षेत्रज्ञ) कारण आहे असे म्हटले आहे. [या श्लोकांत 'कार्यकरण' या ऐवजी 'कार्यकारण' असाहि पाठ आहे; व तेव्हां सांख्यांची महदादि तेवीस तत्त्वं एकापासून एक अशा कार्यकारणक्रमाने उत्पन्न होऊन सर्व व्यक्त सृष्टि प्रकृतीपासून बनाये असा त्याचा अर्थ होतो हाहि अर्थ काही गैरशिस्त नाही, तथापि क्षेत्रक्षेत्रज्ञविचारांत क्षेत्राची उत्पत्ति प्रस्तुत नाही. जग प्रकृतीपासून किसे झाले हे पूर्वी सातध्या नवच्या अध्यायांत वाणले आहे. ह्मणून कार्यकरण' हा पाठच येथें अधिक प्रशस्त दिसतो. शांकरभाष्यांत कार्यकरण' हाच पाठ घेतलेला आहे.]