पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १३. २९ पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान्गुणान् । कारणं गुणसंगोऽस्यसदसद्योनिजन्मसु ॥ २१ ॥ $$ उपद्रष्टाऽनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः । परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन्पुरुषः परः ॥ २२ ॥ य एवं वेत्ति पुरुषं प्रकृति च गुणैः सह । सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ २३ ॥ (२१) कारण प्रकृतीत पुरुष अधिष्ठित झाला म्हणजे प्रकृतीच्या गुणा चा तो उपभोग घेतो; आणि (प्रकृतीच्या) गुणांचा संयोग पुरुषाला बया- बाईट योनीत जन्म घेण्यास कारण होतो. प्रकृति व पुरुष यांच्या परस्परसंबंधाचे व भेदाचे हे वर्णन सांख्य- शास्त्रांतले आहे (गीतार. पृ. १५९-१६० पहा). आतां स्यांपैकी पुरुषाला घेदान्ती परमात्मा म्हणतात असे सांगून सांख्य व वेदान्त यांची जोड घालतात; व तसे केले म्हणजे प्रकृतिपुरुषविचार व क्षेत्र- क्षेत्रंज्ञविचार यांची पुरी एकवाक्यता होत्ये. ] (१२) (हा जो प्रकृतीच्या गुणांचा ) उपद्रष्टा म्हणजे जवळ बसून पहाणारा, अनुमोदन देणारा, भर्ता म्हणजे (प्रकृतीच्या गुणांत) भर घाल. णारा, आणि उपभोग घेणारा त्यासच या देहांतील परपुरुष, महेश्वर आणि परमात्मा असे म्हणतात, (२३) पुरुष (निर्गुण) आणि प्रकृति (च काय ती) गुणांसहवर्तमान, याप्रमाणे जो जाणितो तो कसाहि वागत असला तरी त्याला पुनर्जन्म घडत नाही. [पुरुष म्ह० देहांतील परमात्मा असे २२ व्या श्लोकांत ठरविल्यावर सांख्यशास्त्राप्रमाणे पुरुषाचे जे उदासनित्व व अकर्तृत्व तेच आतां आत्म्याचे अकर्तृत्व होते व सांख्याच्या उपपत्तीची व वेदान्ताची एक- वाक्यता होत्ये. सांख्य म्हणजे वेदान्ताचे शत्रु होत अशी वेदान्तांतीक