पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १. S यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः । कुलक्षयकृतं दोपं मित्रद्रोहे च पातकम् ।। ३०॥ कथं न शेयमस्माभिः पापादस्मानिवर्तितुम् । कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ ३९ ॥ कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः । धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्माऽभिभवत्युत ।। ४० ॥ । [अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिनापहः । शत्रदाराहरश्चैव पडेसे आत. तायिनः ॥ (वसिष्ठस्मृ. ३. १६) म्हणजे घर जाळण्यास आलेला, विष घालणारा, हातांत शस्त्र घेऊन मारण्यास आलेला, धन लुटून नेणारा आणि बायको किंवा शेत हरण करणारा हे सहा आतयायी होत. या दुष्टांस बेशक ठार मारावे, त्यांत काही पाप नाही, असें मनूनहि (मनु. ८,३५०, ३५१) म्हटले आहे ]. (३८) लोभाने बुद्धि नष्ट झालेल्या यांना कुलक्षयामुळे होणारा दोप आणि मित्रद्रोहाचे पातक जरी दिसत नाही, (३९) तरी हे जनार्दना ! कुलक्षयाचा दोष आम्हांस स्पष्ट दिसत असतां या पापापासून पराङ्मुख होण्याचे आमच्या मनात आल्यावांचून कसें रहाणार ? (युद्धांत गुरुवध, सुहृदध व कुलक्षय होणार हे प्रत्यक्ष प्रथमतः दिसून आल्यावर लढाई करण्याचे जे आपले कर्तव्य त्याबद्दल अर्जुनास जोव्यामोह पडला स्यांतील बीज काय? गीतेतील पुढील प्रतिपादनाशी याचा संबंध काय ? व तददृष्टया प्रथमामाध्याचे महत्व कोणते ? इत्यादि प्रभांचा विचार गीतारहस्याच्या पहिल्या व पुनः चवदाच्या प्रकरणांत आम्ही केला आहे तो पहा. लोभाने बुद्धि नष्ट झाल्यामुळे दुष्टांना आपला दुष्टपणा कळत नसला तरी शहाण्या पुरुषार्ने दुष्टांच्या नादी लागून दुष्ट होऊ नये-न पापे प्रतिपापः स्यात्-स्वस्थ बसावे, इत्यादि ज्या सामान्य कोळ्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्या अशा प्रसंगी