पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १४. २७५. $$ नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रशानुपश्यति । गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥ १९ ॥ राजस मध्यम झणजे मनुष्यलोकी राहतात आणि कनिष्ठगुणवृत्तीचे तामस अधोगतीस जातात. [सत्वस्थ मनुष्य धार्मिक व पुण्यकर्मे करणारा असल्यामुळे त्याला स्वर्ग मिळतो, आणि तामस अधर्माचरण करून अधोगतीला जातो, असे सांख्यकारिकेतहि वर्णन आहे (सांका. १४) तसेंच १८ वा श्लोक अनुगीतेतील त्रिगुणवर्णनांतहि अक्षरशः आला आहे (म. मा. अश्व. । ३९.१०; व मनु. १२.४० पहा). पण सात्विक कर्मानी स्वर्गप्राप्ति झाली तरी स्वर्गसुख अनित्य असल्यामुळे परम पुरुषार्थाची सिद्धि त्याने होत नाही. ह' परम पुरुषार्थ किंवा मोक्ष प्राप्त होण्यास उत्तम सात्विक स्थिती राहून, त्याशिवाय प्रकृती निराली व मी (पुरुष) निराळा हे ज्ञान झाले पाहिजे अपा सांख्यांचा सिद्धान्त आहे. यालाच सांख्य त्रिगुणातीतावस्था असह्मगतात; व ही स्थिती सत्व, रज आणि 'तम या तीन गणापलीकडली अपली, तरी सात्विक अवस्धेचीच ती पराकाष्ठा असल्यामुळे तिचा सामान्यतः सात्विक वगातच समावेश करितात, त्यासाठी नवा चवथा वर्ग करीत नाहीत, हे आम्ही गीता- रहस्याच्या सातव्या प्रकरणांत अवेर (पृ.१६५) सांगितले आहे. तथापि प्रकृति व पुरुष हे सांख्यांचे दैवत गीतेस मान्य नसल्यामुळे, प्रकृति व पुरुष यांच्या पलीकडे जो एक आरमस्वरूपी परमेश्वर किंवा परब्रह्म आहे ते निर्गण ब्रह्म जो अळखील तो त्रिगणातीत हाणावयाचा, असे सांख्यांच्या वरील सिद्धान्ताचे गी। रूपन्सर होत असते; आणि तोच अर्थ आता पुढील श्ले कानुन वागला आहे--1 (१९) द्रष्टा म्हणजे उदासीनपणाने पहाणारा पुरुष, (प्रकृतीच्या) गुणाखेरीज दुसरा कोणी कर्ता नाही अ जेव्हां जाणितो, व (तिन्ही) णांच्या पलीकडचे (तत्व) ओळखितो, लेनहां माइया स्वरूपाला पोचतो.