पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १५. २९५

यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ १७ ॥ यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः । अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १८ ॥ असणारे जे (प्रकृतिरूप अव्यक्त तत्त्व) त्यास अक्षर असे म्हणतात. (१७) परंतु जो पुरुष उत्तम तो (या दोहोंहून) भिन्न आहे. त्याला परमात्मा असें म्हण- तात. तोच अव्यय ईश्वर त्रैलोक्यांत भरलला असून (त्रैलोक्याचे) पोषण करितो. (१८) ज्या अर्थी मी क्षराच्याहि पलीकडचा व अक्षराहूनहि उत्तम (पुरुष) आहे त्या अर्थी लोकव्यवहारांत आणि वेदान्तामध्येहि पुरुषोत्तम या नांवाने प्रसिद्ध आहे. [सोळाव्या श्लोकांत 'क्षर' आणि अक्षर' हे दोन शब्द व्यक्त व अव्यक्त -किंवा व्यक्त सृष्टि आणि अव्यक्त प्रकृति-या दोन सांख्यशास्त्रांतील शब्दांशी समानार्थक आहेत. पैकी क्षर म्हणजे नाशवंत पंचभूतात्मक व्यक्त पदार्थ हा अर्थ उघड आहे. पण अक्षर' हे विशेषण पूर्वी अनेक वेळां परब्रह्मासहि लाविलेले असल्या मुळे ( गी. ८३, ८.२१; ११.३७; १२.३ पहा), पुरुषोत्तमाच्या वरील लक्षणांत 'अक्षर' या शब्दाचा • अक्षरपरब्रह्म असा अर्थ नसून सांख्यांची अक्षर प्रकृति असा अर्थ 'आहे, हे लक्षांत ठविले पाहिजे; व हा घोटाळा उत्पन्न होऊ नये झणू- नच 'अक्षर म्हणजे कूटस्थ (प्रकृती)' अशी व्याख्या सोळाव्या श्लोकांत मुद्दाम दिली आहे (गीतारहस्य पृ. १९८-२०१), सारांश, व्यक्त सृष्टि व अव्यक्त प्रकृति यांच्या पलीकडले अक्षरब्रह्म (गी. ८.२० -२२ वरील आमची टीका पहा) आणि क्षिर' (व्यक्त सृष्टी) व 'अक्षर' (प्रकृति ) यांच्यापलीकडला पुरुषोत्तम हे दोन्ही वस्तुतः एकच आहेत. यांसच परमात्मा असे म्हणतात आणि हाच परमात्मा शरीरांत क्षेत्ररूपाने वास करितो असें तेराव्या अध्यायांत सांगि- तले आहे (गी. १३.३१) यावरून क्षराक्षरविचारांत अखेर निष्पना