पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः । । लोक जगांत ईश्वरहि मानीत नाहीत असे म्हटले आहे. जगाचा मूळ आधार याप्रमाणे नाकबूल केला म्हणजे " आत्मन आकाशः संभूतः। आकाशाद्वायुः। वायोरग्निः। अनेरापः। अद्यः पृथिवी । पृथिव्या ओपधयः । ओषधीभ्यः अग्नं अन्नात्पुरुषः।" इत्यादि उपनिषदांतील (ते. २.१), किंवा प्रकृति व पुरुष ही दोन स्वतंत्र मूलतत्वें मानून सच्च रज व तम या तीन गुणांच्या अन्योन्याश्रयाने म्ह०परस्पर मिश्र. णाने सर्व व्यक्त पदार्थ उत्पन्न झाले आहेत, हा सांख्यशास्त्रांतील सृष्टयु- स्पत्तिक्रमहि सोडून द्यावा लागतो. कारण, ही सांखळी किंवा परंपरा जर कबूल केली तर दृश्य सृष्टीत पदार्थापासून मागें जातां जातां या | जगाला काही तरी मूळ आहे असे मानावे लागेल. म्हणून आसुरी लोक जगांतील पदार्थ अपरस्परसंभूत म्ह० एकमेकांपासून कोणत्या- तरी क्रमाने उत्पन्न झालेले आहेत असें कबूल करीत नाहीत. जगाच्या रचनेसंबंधाने एकदां अशी समजूत झाल्यावर मनुष्य प्राणीच प्रधान ठरून स्याच्या कामवासना तप्त करण्यासाठीच नगांतील पदार्थ झालेल आहेत, त्यांचा दुसरा काही उपयोग नाही, असे पुढे ओधानेच प्राप्त होते. आणि हाच अर्थ " किमन्यत्कामहैतुक"--कामाखेरीज त्याचा दसरा काय हेतु असणार ?--या शब्दानी या श्लोकाचे अखेरीस, के पुढील श्लोकांतूनहि, वर्णिला आहे. कित्येक टोकाकार " अपरस्परसंभूतं" याचा अन्वय “किमन्यम्' या पदांशी लावून "परस्पर झणजे स्त्रीपुरुष यांच्या संयोगापासून न झालेले असें दुसरे काही दिसतें काय ? नाही; आणि असा पदार्थच जर दिसत नाही तर हे जग कामहेतुक म्हणजे स्त्रीपुरुषांच्या कामेच्छेपासूनच निर्माण झाले आहे," असा अर्थ लावितात; आणि कित्येक "अपरश्च परश्च" अपरस्परौ असा विलक्षण विग्रह करून 'अपरस्पर' म्हणजेच स्त्री-पुरुष व स्यापासून हे जग झाले असून त्याला स्त्री-पुरुषांचा