पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता. भाषान्तर व टीपा-अध्याय १६. ३०३ प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥९॥ काम हाच हेतु आहे, दुसरे काही कारण नाही," असा याच पदांचा अर्थ लावीत असतात. पण हा अन्वय सरळ नाही, आणि 'अपरश्च परश्च' याचा समास अपर-पर' होईल, मध्ये ' अपरस्पर' असा सकार येणार नाही. शिवाय अ-सत्य, अ-प्रतिष्ठ, वगैरे पूर्वीची पदें पाहिली तर अ-परस्परसंभूत हा नत्रसमासच असला पाहिजे असें दिसून येते; आणि मग 'परस्परसंभूत' या शब्दाने सांख्यशास्त्रांत 'गुणापासून गुणांचे अन्योन्यजनन' वर्णिले आहे, तेच या ठिकाणी विवक्षित आहे असे म्हणावे लागत (गीतारहस्य पृ. १५५ च १५६ पहा), 'अन्योन्य' व 'परम्पर' हे दोन्ही शब्द समानार्थक असून सांख्यशास्त्रांतील गुणांच्या अन्योन्य लटपटी वर्णन करितांना हे दोन्ही शब्द येत असतात (म. भा. शां३०५, सां. का. १२ व १३ पहा). गीतेवरील माध्वभाष्यांत हाच अर्थ स्वीकारून जगांतील वस्तु एकमेकांपासून कशा उत्पन्न होतात हे दाखविण्यास "अन्नाद्भवति भूतानि इ०-', (अग्नीत टाकिलली आहुति सूर्यास पोचत्ये म्हणून ) यज्ञापासून वृष्टि, वृष्टीपासून अन्न व अन्नापासून प्रजा उत्पन्न होत्ये-हा गीततीलच श्लोक दिला आहेगी. ३.१४; मनु. ३.७१ पहा). पण तेतिरीय उपनिषदांतील वचन यापेक्षा अधिक प्राचीन व व्यापक असल्यामुळे तेच आम्ही वर प्रमाणार्थ घेतले आहे. तथापि गीतेतील 'अ-परस्परसंभूत' या पदाने उपनिषदां- तील सृष्टयुत्पत्तिक्रमापेक्षां सांख्यांचा सृष्टयुत्पत्तिक्रमच जास्त विवक्षित आहे, असे आमचं मत आहे. असो; जगाच्या रचनेसंबंधाने वर जे आसुरी मत सांगितले स्याचा या लोकांच्या वर्तनावर काय परिणाम बडतो ते आतां सांगतात. वरील श्लोकांत शेवटी 'कामहैतुक' असें, जै पद आहे त्याचेच जास्त स्पष्टीकरण आहे.] । (९) अशा प्रकारची दृष्टि स्वीकारून अल्पबुद्धीचे हे नष्टास्मे व दुष्ट लोक दूर करें आचरीत जगाचा क्षय करण्यास उत्पन्न होत असतात