पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् । उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ॥ १० ।। 55 अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते । यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ ११ ॥ वर्णन असते (वाग्भट. सूत्र. अ. १० पहा). कटु व तिक्त यांचेच अनुक्रमे कडू व तिखट हे अपभ्रंश आहेत, पण मराठीत त्यांच्या अ- र्थाची अदलाबदल झालेली आहे. 'अपरोक्ष' या शब्दाचेहि मराठी व संस्कृत अर्थ असेच भिन्न होतात. ही गोष्ट शब्दव्युत्पत्तिशास्त्रदृष्टया महत्वाची आहे.] (१०) तामस पुरुषास आवडणारे अन्न वेळ होऊन गेलेले म्हणजे निवालेलें, नीरस, दुर्गंधी, (एक दिवसाचे) शिळे झालेले, उष्ट्र आणि तसेंच अपवित्र असते. [सात्त्विक मनुष्यास साविक, व राजस मनुष्यास राजस, अगर तामस मनुष्यास तामस अन्न आवडते, इतकेच नव्हे तर उलटपक्षी आहार शुन्द्र म्हणजे सात्विक टविल्याने मनुष्याची वृत्तिहि हळूहळू शुद्ध किंवा सात्विक होऊ शकत्ये--आहारशुद्धौ सत्त्वशुद्धिः-असें ठप- निषदांत म्हटले आहे. (छां. ७.२६.२). कारण, मन, बुद्धि हे प्रकृतीचे विकार असल्यामुळे खाणे साविक असल्यास त्याप्रमाणे बुद्धिहि आपोआपच साविक बनत्ये. आहाराचे हे भेद झाले. आतां याचप्रमाणे यज्ञाचेहि तीन भेद कसे होतात. ते सांगतात.] (११) फलाशेची आकांक्षा न ठेवितां यज्ञ करणे हे आपले कर्तव्य समजून शास्त्रविधीप्रमाणे शान्त चित्ताने जो यज्ञ करितात तो सात्विक