पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १७. ३१३ अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् । इज्यते भरतश्रेष्ठ तं यशं विधि राजसम् ॥ १२ ॥ विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणम् । श्रद्धाविरहितं यज्ञ तामसं परिचक्षते ॥ १३ ॥ ६ देवद्विजगुरुनाशपूजनं शौचमार्जवम् । ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १४ ॥ अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् । स्वाध्यायाभ्यसनं चैव वाडायं तप उच्यते ॥ १५ ॥ होय. (१२) पण फलाची इच्छा ठेवून किंवा दंभार्थ म्हणजे ऐश्वर्यप्रदर्श- नार्थहि जो यज्ञ करितात तो यज्ञ हे भरतश्रेष्टा ! राजस असे समज. (१३) शास्त्रविधि सोडून अन्नसंतर्पणाशिवाय, मंत्रांवांचून, दक्षिणा न देतां आणि श्रद्धा नसतां (केलेला) जो यज्ञ त्याला तामस म्हणतात. । [आहार व यज्ञ यांप्रमाण तपाचेहि तीन प्रकार आहेत, पण आधी कायिक, वाचिक व मानसिक असे तमाचे तीन भेद करून नंतर या तिघांच्याहि प्रत्येकी सत्व, रज व तम या गुगांनी होणाऱ्या विध्याचे वर्णन केले आहे. तप म्हणजे अरण्यांत जाऊन पातंजल योगाने शरीर कप्टविणे असा संकुचित अर्थ या ठिकाणी विवक्षित नसून यज्ञयागा. दिक कमैं, वेदाध्ययन किंवा चातुर्वण्याप्रमाणं ज्याचं जे कर्तव्य-उदा. हरणार्थ क्षत्रियास युद्ध, वैश्यास व्यापार इ०-ते सर्व त्याचे तपच होय असा जो 'तप' शब्दाचा ब्यापक अर्थ मनूने दिला आहे (मनु. ११.२३६) तोच गीतेच्या खालील श्लोकांत अभिप्रेत आहे.] (१४) देव, ब्राह्मण, गुरु व विद्वान, यांचे पूजन, शुचिर्भूतपणा, सरळपणा, ब्रह्मचर्य व आहंसा यांस शारीर म्हणजे कायिक तप म्हणतात. (१५) (मनाला) उद्वेग न देणारे, सस्य, प्रिय व हितकारक, असे जे भाषण