पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर वटीपा-अध्याय १८. श्रीभगवानुवाच । काम्यानां कर्मणां न्यासं संन्यास कवयो विदुः । वाची मनुप्ये अगर दुसरा नानाविध पसारा कसा होतो या क्षराक्षरविज्ञा नान्तर्गत विषयाचा चवदाव्यापासून सतराव्यापर्यंत चार अध्यायांत सविस्तर विचार करून ज्ञानविज्ञाननिरूपण पुरे केले आहे. तथापि ठिक- ठिकाणी तूं कर्म कर, असाच अर्जुनास उपदेश असून, परमेश्वराची भक्ति करून शुद्धान्त:करणाने 'परमेश्वरार्पण पूर्वक स्वधर्माप्रमाणे केवळ कर्तब्य म्हणून आमरणान्त सर्व कर्मे करीत रहाणे' हा कर्मयोगपर आयुष्यक्रमणाचा मार्गच सर्वांत उत्तम असा सिद्धान्त केला आहे. ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाचे प्रमाणे सांगोपांग विवेचन झाल्यावर, त्याच धर्माचा अठ- राव्या अध्यायांत उपसंहार करून अर्जुनाला स्वेच्छेने युद्ध करण्यास प्रवृत्त केले आहे. गीतेत सर्वोत्तम म्हणून प्रतिपादन केलेल्या या मार्गात • तूं चतुर्थाश्रम धारण करून संन्यासी हो,' असें अर्जुनाला सांगितले नाही. तथापि या मार्गाने वागणारा मनुष्य नित्यसंन्यासी' (गी. ५.३) असतो, असे म्हटले आहे. म्हणून चतुर्थाश्रमरूपी सन्यास घेऊन सर्व कर्माचा केव्हां तरी खरोखरच त्याग करण्याचे तत्त्व या कर्मयोगमागांत आहे की नाही, नसल्पास संन्यास व 'व त्याग' या दोन शब्दांचें काय असा अर्जुनाचा आतां प्रश्न आहे. गीतारहस्य पृ. ३४४-३४७ पहा.] अर्जुन म्हणाला-(१)हे महाबाहो हृषीकेशा! संन्यासांतील तत्व, आणि हे केशिदत्यनिषूदना ! त्यागांतील तरत्र मी पृथक जाणू इच्छितो. [सन्यास' व 'त्याग' या शब्दांचे केवळ कोशकारांनी दिलेले अर्थ किंवा त्यांतील भेद विचारण्यासाठी हा प्रश्न केलेला नाही. दोहोंचाहि धावर्थ · सोडणे' असा असून ही गोष्ट अर्जुनास माहीत नव्हती असे नाही. परंतु भगवान् कम सोडण्यास कोठेच सांगत नसून चवथ्या, पांवन्या किंवा सहाम्या अध्यायांत (४.४१%;". ३६.१) अगर गी. र.२०