पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. यशदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ ३ ॥ कर्माचे जे फल शास्त्रांत सांगितले आहे, उदाहरणार्थ, पुत्रप्राप्तीसाठी पुत्रेष्टि, त्या फलासाठी ते कर्म केले तर काम्य झाले आणि त्या फलाची इच्छा मनात न ठेवतां तेच कर्म केवळ कर्तव्य म्हणून केले तर ते निष्काम म्हणावयाचे. सर्व कर्माचे 'काम्य' आणि 'निष्काम' (किंवा मनुच्या परिभाषेप्रमाणे प्रवृत्त व निवृत्त) असे दोन भेद झाल्यावर, कर्मयोगी सर्व प्रकारची काम्य कम अजीबात सोडितो म्हणून कर्मयोगांतहि काम्यकर्माचा 'संन्यास' करावा लागतो असें सिद्ध होते. कर्माच्या वरील दोन वर्गापी निष्काम कर्म शिल्लक राहिली. ही निष्काम कर्मे कर्मयोग्याने केली पाहिजेत, असा गीतेचा निश्चित उपदेश आहे हे खरे; पण त्यांतहि फलाशेचा सर्वस्वी 'त्याग' करावा लागतो (गी. ६.२). म्हणून त्यागाचे तत्वहि पीताधर्मात कायमच रहाते. सारांश, सर्व कर्मे न सोडितांहि संन्यास' व 'त्याग' ही दोन्ही तर कर्मयोगमागात कायम रहातात, हे अर्जुनाच्या लक्षात येण्यासाठी संन्यास म्हणजे 'काम्य कर्माचा अजीबात संन्यास', आणि त्याग' म्हणजे 'जी कर्मे करावयाची त्या सर्वांत फलाशेचा त्याग' या दोन व्याख्या या श्लोकांत दिल्या आहेत. मागे संन्यास (किंवा सांख्य) व योग हे तरवत: एकच आहेत, असे दाखवितांना 'संन्यासी' या शब्दाचा (गी ५.३-६ व ६.१,२ पहा), व पुढे याच अध्यायांत 'त्यागी ' शब्दाचा (गी. १८.११) अर्थहि याचप्रमाणे केलेला असून, प्रक्रतस्थली तोच अर्थ इष्ट आहे. ब्रह्मचारी गास्थ व वानप्रस्थ अशा क्रमानें “ शेवटी प्रत्येकाने सर्वकर्मत्यागरूप संन्यास अगर चतुर्थाश्रम घेतल्याखेरीज मोक्षप्राप्तीच होत नाही," हे स्मात मत येथे प्रतिपाद्य नाही. संन्याशाचा भगवा वेष घेऊन कर्मयोगी सर्व कर्माचा स्याग करीत नसला तरी तो संन्याशाचे खरे तत्व पाळीत असल्यामुळे कर्म- योगाचा स्मृतिग्रंथाशी विरोध नाही असे यावरून सिद्ध होते. आता