पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३२५ निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम । त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सप्रकीर्तितः ॥ ४ ॥ यशदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् । यशो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥ ५ ॥ एतान्यपि तुं कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च । कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥ ६ ॥ संन्यासमार्ग व मिमांसक यांच्यामधील कर्माबद्दलच्या वादाचा उप न्यास करून कर्मयोगशास्त्राचा त्या बाबतींतील अखेर निर्णय सांगतात- (३) कर्म दोषयुक्त म्हणून त्याचा (सर्वस्वी) त्याग करावा असे कित्येक पंडित ह्मणतात; आणि यज्ञ, दान, तप व कर्म यांचा कधीहि त्याग करूं नये असे दुस-यांचे म्हणणे आहे. (४) तरी है भरतश्रेष्टा ! त्यागाबद्दल माझा निर्णय काय तो ऐक. त्याग हे पुरुषश्रेष्ठा ! तीन प्रकारचा सांगितला भाहे. (५) यज्ञ, दान, तप आणि कर्म यांचा त्याग करूं नये; ती (कमें) केलीच पाहिजेत. यज्ञ, दान व तप, ही शहाण्या पुरुषांस (हि)पावन म्हणजे चित्तशुद्धिकारक आहेत.(६) म्हणून ही (यज्ञदानादि) कर्मे सुद्धा आसक्ति न ठेवता फलांचा त्याग करून (इतर निष्काम कर्मा प्रमाणेच लोकसंग्रहार्थ) केली पाहिजेत, असें पार्था ! माझें निश्चित मत (असून तेच) उत्तम आहे. । [कर्माचा दोष म्ह० बंधकत्व कमांत नाही, फलाशेत आहे. म्हणून सर्व कमै फलाशा सोडून निष्काम बुद्धीने करावी असे कर्मयोगाचे जें तत्व पूर्वी अनेक वेळा सांगितले त्याचा हा उपसंहार आहे. सर्व करें दोषयुक्त अतएव त्याज्य होत हे संन्यासमार्गातले मत गातेस संमत नाही (गी. १८.१४ व ४५ पहा), गीता फक्त 'काम्य' कमांचा सन्यास करण्यास सांगत आहे. पण धर्मशास्त्रांत प्रतिपादिलेली कम पाहिली