पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३४॥ - - - - $$न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः। सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ ४० ॥ (४०) या पृथ्वीवर, आकाशांत किंचा देवांत म० देवलोकीहि असे काही नाही की जे प्रकृतीच्या या तीन गुणांपासून मुक्त . सुटलेले आहे. [अठराव्या श्लोकापासून येथपर्यंत ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, पति व सुख यांचे भेद दाखवून, व एकंदर जगामध्ये प्रकृतीच्या गुणभेदाने वैचित्र्य कसे उत्पन्न होते याचे चित्र अर्जुनाच्या डोळ्यांपुढे मांडून या सर्व प्रकारांत सात्त्विक प्रकार श्रेष्ठ व ग्राह्य असे प्रतिपादन केले. या साविक प्रकारांमध्येहि जी श्रेष्ठ स्थिति तिलाच गीतेन त्रिगुणातीता- वस्था हें नांव दिलेले आहे. त्रिगणातीत किंवा निर्गुण हा गीतेप्रमाणे । एक स्वतंत्र हाणजे चवथा भेद नाही, हे आम्ही गीतारहस्याच्या सातव्या प्रकरणांत (पृ. १६५) सांगितले आहे; आणि हाच न्याय स्वीकारून मनुस्मृतींतहि सात्त्विक गतीचेच पुनः उत्तन, मध्यम व कनिष्ट असे तीन भेद करून, उत्तम सात्त्विक ह्मणजे मोक्षद, व मध्यम सात्त्विक ह्मणजे स्वर्गप्रद, असें झटले आहे (मनु. १२.४८-५० व ८९...९१ पहा). असो; जगांतील प्रकृतीच्या वैचित्र्याचे हे वर्णन संपलें. आतां या गुणविभागानेच चातुर्वर्ण्यव्यवस्था कशी उत्पन्न झाली याचे निरूपण आहे. स्वधर्माप्रमाणे ज्याने त्याने आपले 'नियत' ह्मणजे नेमलेले कर्म फलाशा सोडून, पण शृति, उत्साह व सारासारविचार कायम ठेवून करणे हेच त्याचे या जगांतील कर्तव्य होय असें वर अनेक वेळा सांग. ण्यांत आले (१८.७-१,२३, ३.८ पहा). पण हे कर्म ज्याने 'नियस' होते, त्यांतील बीज अद्याप कोहि सांगितले नाही. मागें चातुर्वण्र्य. व्यवस्थेचा त्रोटक उल्लेख आलेला असन (४.१३), कर्तव्यास्तध्य- 'निर्णय शास्त्राप्रमाणे करावा, असे हटले आहे (गी. १६.२४). पण जगाचे व्यवहार शिस्तीने चालण्याकरितां (गी. र. पृ. ३३२, ३९६ - - - - -