पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांता, भाषान्तर व टीपा-अध्याय .. ३४१ $$ स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः । स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदति तच्छृणु ॥ ४५ ॥ यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् । स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धि विंदति मानवः ॥ ४६॥ चातुर्वण्र्य व्यवस्था स्त्रभावजन्य गुणभेदाने निर्माण झालेली आहे; ही उपपत्ति गीतेतच अपूर्व आहे असे नाही. महाभारतांत वनपर्वात नहुयुधिष्ठिर व द्विजव्याध-संवादांत (वन. १८० व २११), शान्ति पर्वात भृगुभारद्वाजसंवादांत (शा. १८८), अनुशासनपर्वात उमामहे- श्वरसंवादांत (अनु. १४३), आणि अश्वमेधपात अनुगीतेत (अश्व. ३९.११ ) हीच गुणभेदाची उपपत्ति थोड्याशा फरकाने आढळून येत्ये. जगांतील विविध व्यवहार प्रकृतीच्या गुणभेदाने चालले आहेत हे पूर्वीच सांगितले आहे; आणि कोणी काय करावे हे ज्या चातुर्वर्ण्य- व्यवस्थेने ठरविले जाते ती ध्यवस्थाहि प्रकृतीच्या गुणभेदाचा परिणाम होय, असे सिद्ध केले. आता हीच कमें प्रत्येकाने निष्काम बुद्धीने म्ह. परमेश्वरार्पणबुद्धीने केली पाहिजेत, एरवीं जग चालावयाचे नाही. आणि याप्रमाणे मनुष्य वागला म्हणजे त्यानेच सिद्धि मिळत्ये, सिद्धि मिळण्यास दुसर कोणतेच अनुष्ठान करण्याची जरूर नाही, असे सां. गतात---] (४५) आपआपल्पा (स्वभावजन्य गुणांप्रमाणे प्राप्त झालेल्या) क- मांत जो पुरुष नित्य रत त्याला (यागैच) परम सिद्धि प्राप्त होत्ये. आ. पल्या कर्मात तत्पर राहिल्याने सिद्धि कशी मिळत्ये ते ऐक. (४६) ज्याच्यापासून सर्व भूतांची प्रवृत्ति झाली व ज्याने हे सर्व जग विस्तारिलें किंवा व्यापिलें आहे. त्याची पूजा आपल्यास (स्वधर्माप्रमाणे) प्राप्त झा- लेल्या कर्मानी ( केवळ बाणानें अगर पुष्पांनी नव्हे) केली म्हणजे मनु- प्याला (स्यानेच) सिद्धि प्राप्त होत असल्ये.