पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ श्रीमद्भगवद्गीता. न वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ॥ न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२॥ देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा। तथा देहान्तरप्राप्तिधारस्तत्र न मुह्यति ॥ १३ ॥ (१२) असे पहा की मी (पूर्वी) कधी नव्हता असे नर नाहींच, तूं व हे राजे (पूर्वी ) नव्हते असे नाही, आणि आपण सर्व यापुढे होणार नाही असेंहि नाही. | [ या श्लोकावर टीका करितांना रामनुजभाप्यांत असे लिहिले आहे की, 'मी' म्हणजे परमेश्वर आणि “ तूं व राजे" म्हणजे इतर आत्मे हे दोन्हीहि जर पूर्वी व पुढे होणार आहेत तर परमे वर व आस्मा हे दोन्ही पृथक, स्वतंत्र व नित्य आहेत असे या श्लोकावरून सिद्ध होते. पण हे अनुमान बरोबर नाही, सांप्रदायिक अाग्रहाचे आहे; कारण या ठिकाणी सर्वच निस्य आहेत एवढेच प्रतिपाद्य असून त्यांचा परस्पर संबंध काय ह येथे सांगितले नाही व सांगण्याचे कारणहि नव्हते. तसा प्रसंग आला तेव्हा सर्व प्राण्यांचा शरीरांत देहधारी आत्मा मी म्हणजे एकच परमेश्वर आहे असा अद्वैत सिद्धांत पुढे गीतेतच (गी. ८.४; १३.३१) स्वच्छ सांगितला आहे. ] (१३) देह धारण करणा-यास या देहांत ज्याप्रमाण बालपण, तरुणपण आणि म्हातारपण (प्राप्त होते), त्याप्रमाणेच (पुढे) दुसरा देह प्राप्त होत असतो. (म्हणून ) या बाबतींत ज्ञानी पुरुष मोह पावत नात. । "मी अमक्याला कसे मारू" हीच काय ती अर्जुनाच्या मनातील मोठी भीति अगर मोह होता. म्हणून तो घालविण्याकरितां मरणे म्हणजे काय आणि मारणे म्हणजे काय याचाच तत्वदृष्टया भगवान् प्रथम