पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५२ श्रीमद्भगवद्गीता. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु। मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥६५॥ सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं बज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिश्यामि मा शुचः ।। ६६ ॥ ही गोष्ट तुला सांगणार आहे. (६५) माझ्या ठायीं मन ठेव, माझा भक्त हो, माझं यजन कर, आणि मला वंदन कर. (ह्मणजे) तुं मलाच येऊन मिळशील, हे सत्य प्रतिज्ञेने मी तुला सांगतो, (कारण) माझा तूं आवडता (भक्त) आहेस. (६६) सर्व धर्म सोडून तूं मला एकट्या- लाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, भिऊ नको. [केवळ ज्ञानमार्गातील टीकाकारांस हा भक्तिपर उपसंहार गोड वाटत नाही. म्हणून धर्म या शब्दांतच अधर्माचा समावेश करून “धर्म व अधर्म, कृत व अकृत, भूत व भव्य ही सर्व टाकून देऊन त्यांचे पलीकडचे परब्रह्म ओळख, " असा जो कठोपनिषदांत उपदेश आहे (कद. २.१४ ) त्याशी हा श्लोक समानार्थक असून यांत निर्गण ब्रह्माला शरण जाण्यास सांगितले आहे, असे ते म्हणतात. कठोपनिष- दांतील श्लोक महाभारतांतहि निर्गुण ब्रह्माच्या वर्णनांत आला आहे (शां. ३२५.४०:३३१.४५). पण दोन्ही ठिकाणी धर्म आणि अधर्म अशी ज्याप्रमाणे स्पष्ट पदे आहेत, तशी गीतेत नाहीत, गीतेला निर्गुण ब्रह्मा मान्य असून तेंच परमेश्वराचे श्रेष्ठ स्वरूप होय असा गीतेत निर्णय केला आहे, हे खरे आहे ( गीता ७.२४.) तथापि व्यक्तोपासना सुलभ व श्रेष्ठ असाहि गीतेचा सिद्धान्त असल्यामुळे (१२.५), व भगवान श्रीकृष्ण येथें स्वतःच्या व्यक्त रूपालाच उद्देशून बोलत असल्यामुळे, हा उपसंहार भक्तिपर च आहे, असे आमचे कायमचे मत आहे. अर्थात् निर्गुण ब्रह्म या ठिकाणी विवक्षित नसून धर्म या शब्दानें अहिंसाधर्म, सत्यधर्म, मातृपितृसेवाधर्म, गुरुसेवाधर्म, यज्ञयागधर्म, दानधर्म, संन्यासधर्भ