पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ श्रमिद्भगवद्गीता. - - - - - - - - - - - - F5 कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणीः ।। ह्मणून कर्मापेक्षां वृद्धि च श्रेष्ठ होय; इत्यादि नीतितत्वांचा गीतारहस्याच्या चवथ्या, बाराच्या व पधराव्या प्रकरणांत (पृ. ८८, ३७१, व ४७१- ४७६ पहा ) विचार केला आल्यामुळे, येथें अधिक चर्चा करीत नाही. वासनात्मक बुद्धि सम व शुद्ध रहाण्यास कार्याकार्याचा निर्णय करणारी व्यवसायातमक बुद्धि प्रथम स्तर झाली पाहिजे, ह चर ४१ च्या श्लोकांत सांगितलेच आहे. ह्मणन 'साम्यबुद्धि' या शब्दानेच स्थिर व्यवसाया- स्मक बुद्धि आणि शद्ध वासना ( वासनात्मक) या दोहोंचाहि बोध होतो; ही साम्य बुद्धिच शुद्ध आचरणाचे किंवा कर्मयोगाचे मूळ अस- ल्थासुले, ३९ व्या श्लोकांत कमें करूनहि कर्माचा बाधा न लागणारी युक्ति किंवा योग तुला सांगतो असे जे भगवंतांनी म्हटले आहे, त्याला । अनुसरून या श्लोकांत " कमें करितांना बुद्धि स्थिर, पवित्र, सम व शुद्ध ठेवणे" हीच ती 'युक्ति' किंवा 'कौशल' असून यासच 'योग' म्हणतात अशी योग शब्दाची द्विवार व्याख्या केली आहे. ५० व्या श्लोकांतील “ योगः कर्मसु कौशलम् " या पदाचा याप्रमाणे सरळ अर्थ लागत असता कित्येकांनी " कर्मसु योर: कौशलम् "-कर्माच ठायीं जो योग त्याला कौशल म्हणतात-असा अढाताणीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण कौशल' शब्दाची व्याख्या देण्याचे येथे काही कारण नसून 'योग' शब्दाचें लक्षण सांगणेच प्रस्तुत असल्यामुळे हा अर्थ खरा मानितां येत नाही. शिवाय 'कर्मसु कौशलम्' असा सरळ अन्वय लागत असता "कर्मा योगः" अशी उलटापालट करणहि योग्य नव्हे. अशा रीतीने साम्यबुद्धीने सर्व कामे केली म्हणजे व्यवहाराचा लोप न होता पूर्ण सिद्धि किंवा मोक्ष प्राप्त झाल्याखेरीज रहात नाही असें आतां सांगतात-


---