पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ श्रीमद्भगवद्गाता. यततो ह्यपि कौतेय पुरुषस्य विपश्चितः । इंद्रियाणि प्रमार्थानि हरन्ति प्रसभं मनः ॥ १० ॥ तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः । वशे हि यस्येद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्टिता ॥ ६१॥ अगदीच सोडून देऊ नयेत, या सहाव्या अध्यायांतील श्लोकांत स्पष्टपणे वर्णिला आहे (गी. ६. १६, १७ आणि ३.६, ७ पहा). सारांश, शरीर कृश करणारौं निराहारादि साधने एकांगी अतएव त्याज्य ठरवून माफक आहारविहार आणि ब्रह्मज्ञान हंच इंन्द्रियनिग्रहाचे उत्तम साधन होय असा गीतेचा सिद्धान्त आहे, हे लक्षात ठेविले पाहिजे. या श्लोकांत रस या शब्दाचा जिव्हेने अनुभवास येणारा गोड, कड० रस असा अर्थ करून, उपोषणांनी बाकीच्या इंन्द्रियांचे विषय सुटले तरी जिव्हेचा रस म्हणजे खाण्यापिण्याची इच्छा कमी न होतां पुष्कळ दिवसांच्या निरा- हाराने ती अधिक तीत्र होत्ये. असा अर्थ कित्येक करितात; आणि भागवतांत अशा अथांचा एक लोकहि आहे (भाग.११.८.२०). पण आमच्या मते गीतेतील या श्लोकाचा असा अर्थ करणे बरोबर नाही. कारण दुसऱ्या चरणाशी तो जुळत नाही. शिवाय भागवतांत 'रस' शब्द नसून 'रसन' हा शब्द आहे आणि गीतेतील श्लोकाचा दुसरा चर- गहि तेथे नाही. म्हणून भागवतांतील व गीतेतील श्लोक एकार्थक मानणे युन नाही. ब्रह्मसाक्षात्काराखेरीज पुरा इन्द्रियनिग्रह होणं शक्य नाहीं, हाच अर्थ पुढील दोन श्लोकांत आतां अधिक स्पष्ट करून सांगतात.-] (६०) कारण, केवळ (इन्द्रियदमनार्थ) प्रयत्न करणाऱ्या विद्वानाचें देखील मन, हे कुंतीपुत्रा ! ही दांडगी इंद्रिये बलात्काराने भलतीकडे ओढून नेतात. (६१) (म्हणून) या सर्व इंद्रियांचे संयमन करून युक्त म्हणजे योगयुक्त व मस्परायण होऊन रहावे. आपली इंद्रिये याप्रमाणे, ज्याच्या स्वाधीन झाली त्याची बुद्धि स्थिर झाली (म्हणावयाची).