पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - - - गीता, भाषान्तर ब टीपा अध्याय २. 5 विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः । निममी निरहंकारः स शान्तिमधिगच्छति ।। ७१ ॥ शिान्ति मिळविण्यासाठी कर्मे करूं नयेत असा या श्लोकाचा अर्थ नसून सामान्य लोकांचे मन फलाशेने किंवा काम्य वासनेने गांगरून जाऊन त्यांच्या कमौनी त्यांच्या मनाची शान्ति बिघडते; पण तो सिद्धावस्थेस पाँचला त्याचे मन फलाशेनें क्षुब्ध न होता, कितीहि कमें करावयाची असली तरी त्याच्या मनाची शान्ति न ढळतां समुद्रासारखा शान्त राहून तो ती करीत असतो; व त्यामुळे त्याला सुखदुःखाची व्यथा लागत नाही असा भावार्थ आहे (वरील श्लोक ६४ व गी.. १९ पहा). आता या विषयाचा समारोप करून स्थितप्रज्ञाच्या या स्थितीस काय नांव आहे ते सांगतात--1 (७१) सर्व काम झणजे आसक्ति सोडून जो पुरुष निःस्पृह होऊन ( व्यवहारांत) वागतो, व ज्याला ममत्व व अहंकार नाहीं त्यालाच शान्ति मिळते? । ['चरति ' ( वागतो) या पदाचा संन्यासमागांतील टीकाकार "भिक्षा मागत हिंडतो" असा अर्थ करितात. पण तो बरोबर नाही, मागे ६४ व ६७ व्या श्लोकांत 'चरन्' व 'चरतां' याचा जो अर्थ आहे तोच येथेहि घेतला पाहिजे. स्थितप्रज्ञाने भिक्षा मागावी असा गीतेत कोठेहि उपदेश नाही. उलट ६४ व्या श्लोकांत त्याने इंद्रिये ताब्यात ठेवून " विषयामध्ये वागावे" असे स्पष्ट म्हटले आहे. म्हणून ' चरति' म्हणजे 'वागतो,' 'जगाचे व्यवहार करितो,' असाच अर्थ केला पाहिजे. 'निःस्पृह' शहाणा पुरुष (स्थितप्रज्ञ) व्यवहारांत कसा वागत असतो याचे श्रीसमर्थानी दासबोधाच्या अत्तरार्धात उत्तम वर्णन केले असून, गीतारहस्याच्या चवदाव्या प्रकरणाचा विषयहि तोच आहे.] - - - - - - - -- - - - - - - - - - - - - -