पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय .. . लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥ २० ॥ असा श्लोक आहे (गणेशगीता २. १८) यावरून प्रकृतस्थली गीतेतील तीन श्लोकांतला जो कार्यकारणसंबंध आह्मीं वर दाखविला आहे तोच बरोबर आहे असे दिसून लि. गीतेतील तीन श्लोकांऐवजी योगवा- सिष्ठांत सर्व अर्थ एकाच श्लोकांत वणिला असल्यामुळे त्यांतील कार्य- कारणभावाबद्दल शंका घेण्यास काहीच जागा रहात नाही. गीतेतील हाच युक्तिवाद महायान पंथांतील बौद्ध ग्रंथकारांनीहि मागाहून उच. ललेला आहे (गी. २. पृ. ५६३ व ५७७ पहा) असो. ज्ञानी पुरुषास स्वार्थ राहिला नसतो याचमुळे त्याने आपले कर्तव्य निष्काम बुद्धीने केले पाहिजे, अशा प्रकारचे निष्काम कर्म मोक्षाच्या आड न येतां स्यानेच सिद्धि मिळते. असे जे वर सांगितले त्याच्या पुष्टीकरणार्थ आतां दाखला सांगतात----] (२०) जनकादिकांनी हि याप्रमाणे कर्मानेच सिद्धि मिळविली, तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टि देऊनहि तुला कर्म करणेच उचित होय. [निष्काम कमांनी सिद्धि मिळते त्याचा दाखला या श्लोकाच्या पहिल्या चरणांत सांगितला असून दुस-या चरणापासून निराळ्या प्रकारच्या प्रतिपादनास सुरवात झाली आहे. ज्ञानी पुरुषाचे लोकांचे ठायीं कांही असले नसले तरीहि, ज्ञानी पुरुषास कर्म चुकत नाही म्हणून त्याने निष्काम कर्म करावे असे सिद्ध केले. पण कर्म करणे चुकत नाही म्हणून ते केले पाहिजे, हा युक्तिवाद कायदेशीर असला तरी सामान्य मनुष्याची तेवयानेच म्हावी तितकी पूर्ण खात्री होत नाही. एकूण अपरिहार्य म्हणून च कर्म करावयाचे, त्यांत दसरे काही साध्य नाही. अशी शंका मनांत येते. म्हणून आपल्या कौन लोकसंग्रह करणे हे ज्ञानी पुरुषाचे एक अत्यंत महत्वाचे असे या जगांतील प्रत्यक्ष साध्य आहे, असे दाखविण्यास या श्लोकांच्या - - --- - - - - - ---..