पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/15

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. (उत्तम वाक्य म्हटले म्हणजे ) में अति विस्तृत नसते, संदिग्ध नसते, त्वरित उच्चारितां येतें, श्रोत्यांच्या कर्णास पीडा देत नाहीं, उरःस्थलापासून कंठाकडे मध्यम स्वरांत-अति उच्च नाही, किंवा अति नीचही नाही-अशा स्वरांत जातें तें होय. ( हृदय, कंठ आणि शिरःस्थान अशा ) तीन ठिकाणी स्पष्टपणे व्यक्त होणाऱ्या ( ह्याच्या ) वाणीकडून खड्ग उगारून आलेल्या शत्रूचेही रंजन झाल्यावांचून रहाणार नाही. ( मग इतरांचे होईल, हे उघडच आहे.) ४६. अशोक शोकापनुद शोकोपहतचेतनम् । - त्वन्नामानं कुरु क्षिप्रं प्रियासंदर्शनेन माम् । ३।६०।१७ - हे शोकहारका अशोका ! माझी शोकानें ज्ञानशक्ति नष्ट झाली आहे. प्रिये (सीते )च्या दर्शनाने मला त्वरित तुझ्या नामाप्रमाणे ( अशोक ) कर. ४७. असृजद्भगवान्पक्षौ द्वावेव हि पितामहः । सुराणामसुराणां च धर्माधर्मों तदाश्रयौ ॥ ६॥३५।१३ ऐश्वर्यसंपन्न अशा पितामहाने ब्रह्मदेवानें-देव आणि असुर असे दोन पक्ष निर्माण केले, आणि त्यांच्या ठिकाणी अनुक्रमें धर्माधर्म उत्पन्न केले. ४८. अस्मिञ्जीवति वीरे तु हतमप्यहतं बलम् । हनूमत्युज्झितप्राणे जीवन्तोऽपि मृता वयम् ॥६।७४।२२ हा वीर हनुमान् जीवंत असतां सैन्य मारले गेले, तरी तें न मारिल्यासारखें आहे; आणि हा मेला असतां आम्ही जीवंत असूनही मेल्यासारखे आहों. ४९. अस्वाधीनं कथं दैवं प्रकारैरभिराध्यते । स्वाधीनं समतिक्रम्य मातरं पितरं गुरुम् ॥ २।३०।३३ माता, पिता, गुरु ही आपल्या स्वाधीन असतां, त्यांचे उल्लंघन करून 'पराधीन दैवाची ( अनेक ) प्रकारांनी आराधना करितात, ती कशाकरितां म्हणून ? ५०. अहं हि वचनाद्राज्ञः पतेयमपि पावके ॥२।१८।२८ भक्षयेयं विषं तीक्ष्णं पतेयमपि चाणवे । नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च ॥२।१८।२९ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri