पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/18

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ सार्थ श्रीरामयणसुभाषितानि. निंबापासून कधीही मधाचा स्राव होत नसतो, ही म्हण लोकप्रसिद्ध आहे. तुझ्या मातेचा जसा थोर कुळांत जन्म झाला आहे, तसाच तुझाही आहे, असें मी मानितो. ६४. आनं छित्त्वा कुठारेण निम्बं परिचरेत्तु कः । यश्चैनं पयसा सिञ्चन्नैवास्य मधुरो भवेत् ॥ २॥३५।१६ कुठाराने आम्रवृक्ष छेदून टाकून त्याच्या जागी निंबवृक्ष लावून त्याची सेवा कोण बरें लावील ? कोणी उदकाने सिंचन करून त्या निंबाची सेवा केली, तरी तो कधीही मधुर होणार नाही. ६५. आयस्ते विपुलः कच्चित्कच्चिदल्पतरो व्ययः। अपात्रेषु न ते कच्चित्कोशो गच्छति राघव ॥२।१००।५४ हे राघवा, तुझी प्राप्ति विपुल आहेना ? तुझा खर्च अति अल्प आहेना ? तुझ्या खजिन्यांतील द्रव्य अपात्रीं खर्च होत नाहींना ? ६६. आराधिता हि शीलेन प्रयत्नश्चोपसेविताः । राजानः संप्रसीदन्ति प्रकुप्यन्ति विपर्यये ॥ २।२६।३५ राजे लोकांची सद्वर्तनाने आराधना आणि प्रयत्नपूर्वक सेवा केली असतां ते प्रसन्न होतात. याच्या उलट वर्तनाने ते क्रुद्ध होतात. ६७. आस्फोटयामास चुचुम्ब पुच्छं ननन्द चिक्रीड जगौ जगाम । स्तम्भानरोहनिपपात भूमौ निदर्शयन्स्वां प्रकृति कपीनाम् ॥ ५।१०।५४ , ( मारुतीने ) आपलें पुच्छ आपटिले, त्याचे चुंबन घेतलें, आनंद पावून त्याने नाना क्रीडा केल्या व गायनही केलें. तो इकडे तिकडे फिरला, स्तंभांवर चढला, आणि मग जमिनीवर उतरला. अशा रीतीनें वानरांचा नैसर्गिक स्वभाव त्याने दाखविला. ६८. आहुः सत्यं हि परमं धर्म धर्मविदो जनाः ॥२।१४।३ 'सत्य हाच परम धर्म होय,' असें धर्मवेत्ते लोक म्हणतात. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri