पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/23

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. ... ९४. कच्चित्सहस्रैर्मूर्खाणामेकमिच्छसि पण्डितम् । पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यानिःश्रेयसं महत् ॥२।१००।२२ हजारों मूर्खाचा त्याग करून एकाच पंडिताचा ( सहवास ) करण्याचे तूं इच्छितोस ना ? कारण, कोणत्याही कार्यासंबंधानें संकट आले असतां पंडितच (तरणोपाय सुचवून ) कल्याण करितो. ९५. कच्चित्स्वादुकृतं भोज्यमेको नानासि राघव । कच्चिदाशंसमानेभ्यो मित्रेभ्यः संप्रयच्छसि॥२।१००/७५ हे राघवा ( भरता ) ! स्वादिष्ठ केलेले भोज्य पदार्थ तूं एकटाच भक्षण करीत नाहीस ना ? त्या पदार्थांची इच्छा करणाऱ्या मित्रांना तूं ते देतोस ना ? ९६. कच्चिदर्थं च कामं च धर्म च जयतां वर । विभज्य काले कालज्ञ सर्वान्वरद सेवसे ॥२॥१००।६३ हे वीरश्रेष्ठा ! तूं कालज्ञ आहेस, तसाच वरदही आहेस; तरी धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थांचें तूं यथाविभाग यथाकाली सेवन करितोस ना ? ९७. कच्चिदर्थं विनिश्चित्य लघुमूलं महोदयम् । क्षिप्रमारभसे कर्म न दीर्घयसि राघव ॥ २॥१००।१९ हे राघवा ! जें अल्प यत्नाने साध्य होणारे व ज्याचे फल मोठे आहे, अशा कार्याचा निश्चय करून ते कार्य त्वरित करितोस ना ? त्या कामी विलंब लावीत नाहीस ना ? (९८. कचिन्न सर्वे कर्मान्ताः प्रत्यक्षास्तेऽविशङ्कया। - सर्वे वा पुनरुत्सृष्टा मध्यमेवात्र कारणम्॥२॥१००।५२ ___ तुझे सर्व चाकर निर्भयपणे तुझ्या दृष्टीसमोर येत नाहीत ना ? किंवा त्या सर्वांना तूं बंदी केली नाहीस ना ? अशा संबंधांत ( राजानें ) मध्यम मार्ग धरिलेला बरा. ९९. कचिन्निद्रावशं नैषि कच्चित्कालेऽवबुध्यसे ।। कच्चिच्चापररात्रेषु चिन्तयस्यर्थनैपुणम् ॥२।१००।१७ ' ce Capt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri