पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/48

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ सार्थ श्रीरामायणसुमाषितानि, २४३. न साम्ना शक्यते कीर्तिन साम्ना शक्यते यशः। प्राप्तुं लक्ष्मण लोकेस्मिञ्जयो वा रणमूनि ॥६।२१।१६ हे लक्ष्मणा ! सामोपायाने ( देशांतरी ) कीर्ति होत नाही, किंवा ( स्वदेशीही) यश प्राप्त होत नाहीं; तसेंच रणांगणावर जयही सामोपचाराने प्राप्त होत नाही. २४४. न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम् । नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति न तत्सत्यं यच्छलेनानुविद्धम् ॥ ७.५९ प्र. ३।३३ जीमध्ये वृद्ध मंडळी नाही, ती सभा नव्हे; जे धर्माचे कथन करीत नाहीत, ते वृद्ध नव्हेत; ज्यामध्ये सत्य नाहीं तो धर्म नव्हे; आणि ज्यांत कपट आहे, तें सत्य नव्हे. २४५. न सुप्रतिकरं तत्तु मात्रा पित्रा च यत्कृतम् ॥२।११११९ - आईबापांनी ( पुत्रावर ) केलेले उपकार फेडणे कधीही शक्य नाही. २४६. न हि कं चन पश्यामो राघवस्यागुणं वयम्॥२॥३६।२७ राघवाच्या ठिकाणी आम्हांला कोणताच दोष दिसून येत नाही. २४७. न हि गन्धमुपाघ्राय रामलक्ष्मणयोस्त्वया । शक्यं संदर्शने स्थातुं शुना शार्दूलयोरिव ॥५।२१३१ कुत्रा वाघाच्या दृष्टीपुढे उभा राहणे जसे अशक्य आहे, त्याचप्रमाणे रामलक्ष्मणांची यत्किंचितही गंधवार्ता-सुगावा लागतांच त्यांच्या दृष्टीसमोर राहणे तुला अशक्य आहे. २४८. न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः । तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥२॥३७।२९ जेथें राम भूपति नाही, तें ( स्थल ) कधीही राष्ट्र होणार नाही; आणि जेथे राम वास करील, तें वनही राष्ट्र होईल. CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri