पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/84

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ सार्थश्रीरामायणसुभाषितानि. विषस्य दाता न तु मेऽस्ति कश्चि च्छस्त्रस्य वा वेश्मान राक्षसस्य ॥ ५।२८।१६ विषाने किंवा तीष्ण शस्त्राने मी आतां प्राणत्याग करावा. परंतु या राक्षसाच्या गृहांत विष किंवा शस्त्र कोणी मला आणून देईल, असा नाही. ४६३. स तु श्रेष्ठैर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः । बहिश्वर इव प्राणो बभूव गुणतः प्रियः ॥२।१११९ श्रेष्ठ गुणांनी युक्त असा तो ( दशरथ ) राजाचा पुत्र आपल्या गुणांनी प्रजांना आपला बहिश्चर प्राणच की काय, असा वाटत होता. ४६४. सत्यधर्माभिरक्तानां नास्ति मृत्युकृतं भयम् ॥६।४६।३४ सत्य धर्माचे ठिकाणी आसक्त झालेल्या लोकांना मृत्यूचे भय नसते. ४६५. सत्यमेकपदं ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः । n सत्यमेवाक्षया वेदाः सत्येनावाप्यते परम् ॥ २॥१४१७ सत्य हे एकपदरूप ( ॐकाररूप ) ब्रह्म आहे; सत्याचे ठिकाणी धर्माची स्थिति आहे; सत्य हे अक्षय वेद आहेत; सत्याने परब्रह्माची प्राप्ति होते. ४६६. सत्यमेवेश्वरो लोके सत्ये धर्मः सदाश्रितः॥२।१०९।१३ सत्य म्हणजेच परमेश्वर होय, सज्जनांनी आश्रय केलेला धर्म सत्याचे ठिकाणी आहे. ४६७. सत्यं बतेदं प्रवदन्ति लोके नाकालमृत्युर्भवतीति सन्तः ॥ ५।२८३। अकाली कोणालाही मरण येत नाही, म्हणून सत्पुरुष बोलतात, ते सत्य आहे. ४६८. सत्यश्चात्र प्रवादोऽयं लौकिकः प्रतिभाति मा। पितॄन्समनुजायन्ते नरा मातरमगन्नाः ॥२॥३५।२८ पुरुष पित्यांप्रमाणे होतात, कन्या मातांप्रमाणे होतात, म्हणून जो लोकप्रवाद आहे, तो सत्य आहे, असे मला वाटते. ४६९. सदृशाच्चापकृष्टाच्च लोके कन्यापिता जनात् ।। प्रधर्षणमवाप्नोति शक्रेणापि समो भुवि ॥ २।११८।३५ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri