पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/22

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सातवे एडवर्ड बादशाह.


 राजे सातवे एडवर्ड महाराजांच्या हातांत % लाडवाप्रमाणे जो गोळा दिसतो तो लाडू नसून हिंदुस्थान-देश [ भूगोल ] रबरी चेंडूप्रमाणे झेळून धरिला आहे. असा त्या गोळ्याचा भावार्थ आहे. अशा रीतीनें अखिल देशरूपीं गोल, कायद्याच्या रुमालांत कुँ गुंडाळून ठेविला आहे. ह्मणून त्यांच्या राज्यांत असा दरारा बसला आहे कीं, कराराप्रमाणे भरारा कामें हैं आटोपलींच पाहिजेत. इतक्या बंदोबस्ताचे करारी यास्तव सरकारानें ‘ हूं' ह्मटल्यावर * कू' म्हणजे बाण्याचे सूक्ष्मदर्शक यंत्रीं राज्यसूत्न असल्यामुळे एकादी गोष्ट सप्त पातालांत गुप्त असली तरी ती प्राप्त होते. कांकू करणार कोण ? एका रात्रीत सर्व राज्यांत जन संख्या मोजावयाची म्हटली तरी तयार ! हाच तो * हुं कुं. ' एकदां आर्डर सुटल्यावर मग कसची आर हैं डाओरड आली ? हुकुमासरशीं सारी कामें न बोलतां गती दिलेल्या यंत्रासारखीं आपोआप चालू लागतात. हुकूभ म्हणावा तर हा हुकूम. ही दहशत आणेि हें सामर्थ्य .