पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/8

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्याची भूतदया अगाध अतुला सर्वत्र विस्तारली । होती यास्तव भूवरीं चहुंकडे ती शांतता राहिली ॥ विद्वन्मानस हंसिका विहरते यत्कीर्ति रम्या अशी । सत्कीर्ति-प्रद तो पिता परम तें सद्भाग्य तूं भोगिशी ॥३॥ { राणी सद्गुण शालिनी प्रिय तुझी मेरी असे सुंदरी । वाटे कीं मज ती रमा वसतसे प्रेमें तुझ्या मंदिरीं ॥ भाग्यें योग्य असा घडे नृपवरा दुग्धी जशी शर्करा । प्रेमानंद सुधेस सेवुनि असे जेवीं पती इंदिरा ॥४॥ आनंदें सदनीं उभारुनि किती राया गुढ्या तोरणे । व्हाया उत्सव साजरा जन झटे हें कायसें सांगणे ॥ वाद्ये सुस्वर वाजती चहुं-कडे सर्वत्रही शोभती । नाना मंगल दीपिका उजळिल्या सर्वा गृहां भवतीं ॥५॥ ऐसे पूर्वज पुण्यशील तुमच्या पुण्यें लुह्यां लाधले । श्रीमत् जार्ज वृपा मजावन कराया जे सदा भागले ॥ ज्यांच्या आचरणांत जी सदयता जी दक्षता शुद्धता । जी न्यायप्रियता सदैव वसली येई न् ती वर्णितां ॥६॥ हो तूं तत्सम शुद्ध भाव धरुनी राया प्रजा-रंजनी । दावी थोर उदारता सरलता प्रेमें प्रजा-पालनी ॥ दुःखें आर्य-महीस जीं असतिं ती सारी निवारी बरें । ΣΑΕάξ दारिद्यास निवारुनी करि सुखी दीना जना सत्वरें |ುಷ್ಟಿ