पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोर्लेसाहेबांच्या आठवणी १३५ बल्ली व तुतिकोरिन येथील खटल्यांत जन्मठेप काळे पाणी व १० वर्षे काळे पाणी अशा शिक्षा झालेल्या ऐकून मोलेंनी लिहिले की, “असल्या शिक्षा कमी झाल्याच पाहिजेत; असल्या अमानुष प्रकाराचें मी बिलकूल समर्थन करणार नाहीं. देशांत शांतता राखली पाहिजे खरी; परंतु कडकपणाची कमाल करणे हा शांतता स्थापित करण्याचा मार्ग नसून उलट त्या योगाने बाँबच्या अत्याचाराचा मार्ग खुला होतो." एवढ्या इषारतीनें न उमजून लॉर्ड मिंटो यांनी परत लिहिले की, "कडक शिक्षा दिल्याबद्दल नापसंती दर्शविल्यानें वाईट परिणाम होईल; येथल्या परिस्थितीला अशाच शिक्षा पाहिजेत. " यावर संतापून जाऊन मोर्ले लिहितात की, “ज्या एका कार्पोरलने संतापाच्या भरांत एका नेटिव्हाचा खून केला त्याला कोणती कडक शिक्षा केली हे तुम्ही लिहून कळवाल कां ? त्या कार्पोरलवर खटला तरी झाला काय व त्याला त्या खुनाबद्दल फांसावर चढविला काय ? लॉर्ड कर्झन यांनी ९ व्या लान्सर पलट- णीला शिक्षा केली तीबद्दल मला कर्झनविषयों खरोखरीच आदर वाटतो. असल्या खुनांना जर आम्ही आळा घालं शकलों नाहीं, तर ब्रिटिशांच्या कडक न्यायपद्धतीचा रिकामा डौल मिरविणें मूर्खपणाच होय. असले सोल्जर आणि असले मळेवाले यांच्या कृत्यांवरून आमचें राज्यधोरण ठरावयाचें काय? हिंदी लोकांना कडक शिक्षा दिल्याबद्दल तुम्ही असे म्हणाल कीं, या शिक्षा न्यायकोर्टाच्या तराजूनें न तोलतां लष्करी कोर्टाच्या ताजव्यानें जोखल्या पाहिजेत; आणि बंडखोरांना तोफे- च्या तोंडीं देण्याऐवजी तुरुंगांत टाकणें ही शिक्षा सौम्यच होय ! असे जर तुमचें खरोखरीच मत असेल तर नवीन स्फूर्तीचा प्रसार आणि उदार राजकीय धोरण व सुधारणा यांचें नांव तरी कशाला काढतां ? सुधारणेची योजनां रहींत फेकून देऊं काय ? "" हिडिस रशियन पद्धति मोर्ले यांच्या या लिहिण्याचा कांहींच उपयोग न होतां उलट व्हाइसरॉयांनी आणखी दोनतीन इसमांस हद्दपार करण्याची परवानगी मागितली. त्यांस मोर्ले उत्तर देतात की, “असला कोरा चेक मी तुम्हांस कधींच देणार नाही. प्रत्येक हद्दपारीच्या हुकूमाच्या पूर्वी मला सर्व हकीकत कळली पाहिजे. गव्हाच्या शेतांतील तण काढून टाकण्याच्या प्रयत्नांत तुम्ही अर्धामुर्धा गहूं देखील उपटून टाकणार असे दिसतं. " लष्करी कायदा सुरू करण्याविषयी सूचना आली असतां ते म्हणतात, “लष्करी कायदा म्हणजे कायदा गुंडाळून ठेवणें असाच मी याचा अर्थ करितों. पण ह्या लष्करी कायद्यानें इटाली, रशिया व आयर्लंड या देशांतील खुनांच्या कटांचा बीमोड झाला नाही आणि हिंदुस्थानांतहि त्यांचा बीमोड होणार नाहीं. ता. १८ डिसेंबरच्या पत्रांत मोर्ले यांनी लिहिलें कीं, “" आरोपीच्या गैरहजेरींत त्याची चौकशी करण्याचें एकहि उदाहरण घडणार नाहीं अशी खबरदारी घ्या. त्या योगाने मोठा अन्याय होईलच असे नाही. पण त्या प्रकारावर ""