पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध राबविणार की राबविले जाणार ? [ काँग्रेसवाल्यांचा कौन्सिलांवरील चहिष्कार कधीच विग्घळून गेला. त्यानंतर मध्यवर्ति व प्रांतिक कायदेमंडळांच्या निवडणुकीला काँग्रेसचे उमेदवार उभे राहिले व कांहीं प्रांतांत ते बहुसंख्येने निवडूनहि आले. तरी पण घटना राबविण्याकरितां आम्ही कौन्सिलांत जात नसून ती मोडण्याकरितां जात आहों, अशी त्यांची भाषा अद्यापहि कायम असल्यानें त्यांना उद्देशून हा लेख लिहिलेला आहे. काँग्रेसवाल्यांनी मंत्रिमंडळे बनविलीं तर ते आपल्या इच्छे- प्रमाणें घटना राचवूं शकतील; उलटपक्षी त्यांनी मंत्रिमंडळे न बनविली तर इतरांच्या मंत्रिमंडळाकडून काँग्रेसवाले या घटनेच्या जोखडाखालीं राबविले जातील. म्हणून तुम्ही घटना 'राबविणार' का स्वतः 'राबविले जाणार' असा सूचक प्रश्न मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना विचारावा असे या लेखांत प्रतिपादिले आहे व त्याला अन्वर्थक असें भर्तृहरीचें वचन 'अवतरणा' दाखल दिले असून, आजपर्यंतच्या कौन्सिल-बहिष्काराचा परिणाम स्वतः काँग्रेसवाल्यांना व जनतेला कसा बाधक झाला हे स्वकृत सुभाषितरूपाने या लेखाच्या शेवटीं वर्णिले आहे.] भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः । तपो न तप्तं वयमेव तप्ताः ॥ 113345 भारवी कवीचा 'सहसा विदवत न कियामविवेकः परमापदां पदं ' हा लोक एक लाख रुपये किंमतीचा आहे असे आख्यायिकेवरून मानले जाते. भर्तृ- दरीच्या कोणत्याहि लोकासंबंधानें तसली आख्यायिका प्रसिद्ध नसली तरी त्याच्याहि नीति व वैराग्य शतकांतले कांहीं कांही मार्मिक श्लोक असेच लाख लाख रुपये किंमतीचे आहेत. वर उद्धृत केलेला श्लोक असाच बहुमोल आहे. त्यांत असंतुष्ट आणि अविवेकी अशा संसारी माणसाचें चित्र रेखाटले आहे. अविवेका व असंतुष्ट माणूस संसारांतील भोगहि भोगीत नाही आणि संसारावर लाथ मारून तपोवनाला जाण्याइतके कडकडीत वैराग्यहि त्याच्या अंगी नसल्याने तपाचरणहि करूं शकत नाहीं; बिचारा व्यर्थ संसारांत कुढत रखडत असतो ? ना संसार ना तप नवी राज्यघटना न राबवितां ती मोडण्यातोडण्याची व्यर्थ वल्गना करणाऱ्या ( केसरी, दि. ५ फेब्रुवारी १९३७ )