पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अक्षय्य टिकणाऱ्या कलाकुसरीचे कारागीर बना २८१ पुष्टिकर व कार्यप्रवणकर असे ज्ञानभोजन कसे देता येईल, याचा शांत चित्ताने व खोल विचार केला जावा. निषेधपर ठरावांची संख्या जितकी कमी आणि नवीन शाखापत्रवोत्पत्तिदर्शक विचारविनिमय जितका अधिक तितका त्या परिषदेचा यशस्वीपणा अधिक अशी आपल्या परिषदेच्या यशापयशाची कसोटी आपण आपल्या दृष्टीसमोर ठेवून आपल्या कार्याला लागाल अशी मी अपेक्षा करतो. विशिष्ट विषयांचीं वृत्तपत्रे विशिष्ट विषयाला वाहून घेतलेली वृत्तपत्रे आपणांत अगदीच नाहीत असे म्हटले तरी चालेल; अशा प्रकारची नियतकालिकें कांही आहेत, परंतु साप्ताहिकें अगदीच थोडीं. त्यांची संख्या वाढावी आणि अशा पत्रांचें वाचकांकडून चीजहि केले गेले पाहिजे, नाही तर असली पत्रे स्वतंत्रपणे चालू शकणार नाहीत. अर्थातच मर्यादित कार्यक्षेत्र आणि वाचकप्रियता या दोहोंचा मेळ कसा घालावयाचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याकडे आपणांस आपला विचारौघ वळवावा लागेल. ग्रामसंस्था, ग्रामपंचायती, लोकलबोर्डे, सॅनिटरी कमिट्या, म्युनिसिपालिट्या इत्यादि विषयांचा समाचार घेणारे पत्र लोकशाहीच्या नवीन राज्यव्यवस्थेत चालण्याला हरकत पडूं नये. अशा विषयाला वाहिलेलें ग्रामणी पत्र बंद झाले ही खेदाची गोष्ट आहे. यावरून अद्यापि आपल्या समाजाची दृष्टि दिखाऊ. राजकारणाकडून टिकाऊ लोकसंग्राहक कार्याकडे वेधली जात नाहीं असे दिसते. ही परिस्थिति सुधारून 'आपले लक्ष असल्या भरीव सुधारणांच्या विषयांकडे खेचलें गेल्यास आपल्या पत्रकारांच्या उपयुक्त कामगिरीत भर पडून आपली वजनदारी वाढेल. पत्रकारांचे वर्गीकरण करा याकरितां माझी अशी सूचना आहे की, उपस्थित किंवा अनुपस्थित अशा सर्व पत्रकारांची यादी करून परिषदेच्या चिटणीसांनी सर्व पत्रकारांचें विषयवारीने वर्गीकरण करावें. अशी वर्गवारी दृष्टीसमोर असली म्हणजे आपण सगळे राजकार- णाकडे द्रव्य, वेळ व बुद्धिमत्ता किती खर्च करतो आणि सामाजिक, औद्योगिक आर्थिक, ग्रामीण, कृषिविषयक व आरोग्यविषयक ज्ञानाचा प्रसार करण्याच्या कामाकडे किती दुर्लक्ष करतों याचा आढावा आपल्या डोळ्यापुढे राहील आणि त्यावरून कोणाला नाहीं तर कोणाला तरी क्षुण्णमार्ग सोडून अक्षुण्ण अथवा अत्यल्पक्षुण्ण मार्गाला लागण्याची प्रेरणा होईल. उदाहरणासाठीं एक सूचना सौ. गं नवीन विषय या दृष्टीने मला 'प्रवास' एक विषय सुचवावासा वाटतो. प्रवासाच्या सोयी, प्रवासाची साधनें, प्रवासांता घ्यावी लागणारी दक्षता, प्रवास अल्प खर्चात व दगदगीशिवाय कसा होईल यासव सूचना व योजना, प्रवाशांचे