पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

@००००००००००००००००००००००००cc८०००००००००००००००००००cc0000cccccc0000 महायुद्ध व परराष्ट्रीय राजकारण 000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 जर्मन गरुडाचे तोडलेले पंख पुनश्च फुटले [ पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जर्मनींतून कायसरशाहीचे उच्चाटन करून तेथें लोकसत्ताक राज्यपद्धति स्थापण्यांत आली. व्हर्साइलच्या तहानें ही जी नवी घटना घडवून आणली ती पांच वर्षे कशीबशी चालल्यावर जर्मन राष्ट्रांत नव्या जोमाचें पाणी खेळू लागले आणि जर्मनीचें पुनरुत्थापन करण्याला हिंडें- बुर्गसारखा खंबीर रणपंडित अध्यक्षपदी स्थापला जावा असे जर्मनीतील राष्ट्रीय पक्षाला वाटून त्या पक्षाने हिंडेंबुर्ग यांची उमेदवारी जाहीर केली. अध्यक्षपदा- साठी हिंडेंबुर्गचें नांव जाहीर होतांच दोस्त राष्ट्रांनी जर्मनांना धमकी देण्यासहि कमी केलें नाहीं. तथापि हिंडेंबुर्गच्या नांवांतील जादू आणि राष्ट्रीय पक्षाची दृढनिष्ठा यांच्या जोरावर हिंडेंबुर्ग हे निवडणुकीत यशस्वी होऊन अध्यक्षपदा- रूढ झाले, ही अद्भुत घटना कशी वडून आली व तिचा जर्मनीवर व इतर राष्ट्रांवर कोणता परिणाम वडेल याची मीमांसा पुढील लेखांत केलेली आढळेल. ] युरोपांतील राजकीय वातावरणांत गेल्या आठवड्यांत एकाएकी मोठे वादळ उद्भवून खळबळ उडून गेली आहे. जर्मनीच्या अध्यक्षपदाकरितां जर्मन भीष्माचार्य ( केसरी, दि. ५ मे १९२५ )