पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध दोस्तांचा पहिला खरा विजय १२ [ दुसरें: महायुद्ध सुरू झाल्यापासून दोस्त राष्ट्रांची सर्वत्र पीछेहाटच होत होती. अशीं तीन वर्षे हार खाल्यावर स्टॅलिनग्राड येथें रशियानें पहिला मोठा विजय मिळवून जर्मन सैन्याला शरण येण्यास भाग पाडलें. तरी पण जर्मनीच्या मर्मावर घाव बसला नव्हता. आफ्रिकेतील युद्ध जिंकून दोस्त राष्ट्रांनीं सिसिली बेटावर स्वारी केली व तें बेट काबीज करून इटालींत कायमचें ठाण मांडलें, त्या वेळीं दोस्तांच्या खऱ्या विजयाबद्दल अभिनंदनपर असा हा लेख आहे.] शाखा पल्लव तोडले महायुद्धाला प्रारंभ होऊन चार वर्षे होत आली. एवढ्या दीर्घकालांत दोस्त राष्ट्रांना अभिमानास्पद आणि शत्रुराष्ट्रांच्या मर्मी झोंबणारा असा ठसठशीत विजय मिळाला नव्हता. रशियानें स्टॅलिनग्राड येथे लक्षावधि जर्मनांना दाती तृण धरा- वयाला लाविलें व स्टॅलिनग्राडपासून खारकोव्हपर्यंत शेंकडों मैल मागेंद्दि हटविलें, तथापि त्यांत रशियानें नवें कांहीं कमावले नसून पूर्वी गमावल्यांतलाच पुष्कळसा भाग परत जिंकला. ब्रिटिश व अमेरिकन सैन्यांनी सगळी उत्तर-आफ्रिका शत्रूच्या हातून सोडविली; तरी तो विजय शत्रुरूपी वटवृक्षाच्या शाखा-पहव तोडण्याच्या तोडीचाच झाला. त्यांत बुंध्याला धक्का लागला नव्हता. आतां मात्र दोस्तांनीं सिसिली बेट हस्तगत करून इटालीच्या मर्मावरच घाव घातला आहे आणि याचा परिणाम एकट्या इटालीवरच होणारा नसून, त्याची कळ जर्मनीच्या मस्तकापर्यंत जाऊन भिडली आहे. दोस्तांचा वरचढपणा ट्यूनीशिया जिंकल्यानंतर दोस्तांची चढाई सिसिलीवरच होणार हे ठरलेंच होतें; असे असून देखील गट्टी राष्ट्रांना सिसिलीवरील स्वारी टाळतां आली नाहीं, अडवितां आली नाही आणि सिसिली राखतांहि आली नाहीं, यावरून गट्टी राष्ट्रांचें सर्व प्रकारचे लष्करी बळ दिवसेंदिवस ओहोटीला लागत चालले आहे हे उघड सिद्ध होतें. आफ्रिकेंत रोमेलच्या सैन्याला मागें हटविण्यांत दोस्तांच्या वैमानिक दलांचें वाढतें सामर्थ्य व्यक्त झालें. रोमेलला युरोपांतून सैनिक व रणसाहित्य यांचा पाठपुरावा होऊं शकला नाहीं, यांत दोस्तांच्या आरमारांचें प्रभुत्व सिद्ध झाले आणि इटालीच्या अगदी पायानजीकचें सिसिली बेटहि त्यास राखतां आलें नाहीं, यांत ( केसरी, दि. २० ऑगस्ट १९४३ )