पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ प्रस्तुत गायकवाड यांणीं विदित केलें कीं स्वामीपासीं सोनजी लोणकर जाऊन हयाल जाहला आहे. "आपण मौजे मुंडवेचे पाटील. आपला उच्छेद गायकवाड यांणीं करून वतन अनुभवितात. स्वामींनी आपले विस राजश्री बाजीराव प्रधान यांस सांगून त्यांचे हात देऊन आपले स्थापना वतनावरी करावी" ह्मणून निवेदन केलें तें स्वामींस प्रमाण वाटलें. स्वामींची स्वाभाविक चिंता की जे विनंती करतील त्यांचें सा- हित्य करावें. त्याअर्थी त्याचेविसीं राजश्री बाजीराव यांस सांगोन हात दिल्हें. ऐशास त्याचा कजिया वतनदारीचा पूर्वोत्तर स्वामींस न कळला. त्या लोणकरी याच्या सांगण्यावरून स्वामींनीं साहित्य केलें. तरी लोणकर पुरातन कुणबी गायकवाड याच्या आजांनीं गांवीं आणून ठेविला. बारा रुपयांचें शेत व घर देऊन दिवाणचा वहसूल करून रहा झणून ठेविला. त्याप्रमाणें चालत असतां कितीक दिवसांनी लोणकर आपली पाटिलकी झणून कजिया करूं लागला आणि राजश्री बाजी- राव प्रधान यापासीं जाऊन हयाल झाला. तेव्हां गायकवाडही बाजी- रावाकडे जाऊन आपली पाटिलकी लोणकर आपला ठेवणाईत कुणबी आहे, सर्वांचे ग्वाही साक्षीनें रास्त न्याय करा; ह्मणून बोलिले. त्यावरून बाजीराव याणीं प्रांत मजकूरचे देशमुख देशपांडे व गांवगन्नाचे पा- टिल वतनदार जमा करून त्यांस येविसींचा हरएक निवाडा करावयास सांगितलें, त्यांनीं गायकवाड व लोणकर याचे पूर्वोत्तर मनास आणून व गायकवाड यांचे पूर्वील महजर कागदपत्र पाहून निवाडा करितां गायकवाडची पाटीलकी खरी. यांणीं लोणकरास शेत व घर देऊन कुणबी ठेविला त्यास संबंध नाहीं ऐसें जाइलें. त्याप्रमाणें बाजीराव प्रधान यांणींही खरेखुरें ऐसें मनांत आणून गायकवाडास पाटीलकीचीं पत्रे दिल्हीं गोताचा महजर दिल्हा. दिवाणाचीं पत्र दिल्हीं. पाटीलकी गायकवाड अनुभवितात. हे वृत्त स्वामींस विदित नव्हतें, ऐसें असोन ● .