पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ कित्येक गप्पा लेहून पाठविल्या. पादशाहासी मजुरा करून घेतला. पादशाहांनीं खुशाली करून सादतखानास वस्त्रे व मोत्यांची माळ व हत्ती व शिरपांव पाठविला. व वकिलासही शिरपांव दिला. आपली बाजू सेर करून घेतली. वरकडही अमिरांस कित्येक प्रकारें धिःकारून लिहिलें तें वृत्त राजश्री धोंडो गोविंद यांणीं वरचेवर लिहून पाठविलें. तात्पर्यार्थ, आमचे फौजेंत जीव नाहीं; केवळ निर्जीव बुडवून नस्तनाबूत केली; असें लिहीत. ( लपंडाव ?) करून दाखविले. मोंगली कारभार आपण ऐकत जाणतच आहेत. करावें थोडें लिहावें फार. पादशाहास सत्य भासलें तें मिथ्या केले पाहिजे. त्याचे विचार दोनः- एक सादतखानास बुडवावें किंवा दिल्लीस जाऊन दिल्लीचें पूर जाळावें. तेव्हां मिथ्या होईल. त्यास सादतखान आगरें सोडीनासें देखोन आह्मी दिल्लीस जावयाचा निश्चय केला. पूर जाळावें व मराठे आहेत असें पादशाहास अवलोकन करावें ऐसा विचार करून, छ० २६ जिल्का कुच करून, पादशाही रस्ता सोडून, लांब लांब मजला करून, दमनसिंग चूडामण जाट या - १ धोंडो गोविंद: – पुरंदरे, पेशव्यांचे दिल्लीचे वकील. - २ हे शब्द ग्रांटडफ साहेबांनी आपल्या इतिहासांत अक्षरश: भाषांतर केले आहेत:-

—“ I was resolved " says Bajee Rao “to tell the Emperor

truth, to prove that I was still in Hindostan, and to show hinm flames and Mahrattas at the gates of his capital. "-Page 235. ३ छ० २६ जिल्काद: - ता. २० एप्रिल शनिवार ३० स० १७३४. — ४ दमनसिंग चूडामण जाट:- चूडामण हा जाट जातीच्या रजपूत लो- कांचा पुढारी होता. तो सतराव्या शतकाच्या अखेरीस उदयास आला. दीग ह्मणून जो प्रसिद्ध किल्ला भरतपुराजवळ आहे त्याच्या दक्षिणेस, त्यानें थून व सि- नसिनवार असे दोन किल्ले बांधिले. औरंगजेबानें दक्षिणेवर स्वारी केली त्या वेळीं हा पुंडावे करीत असे; व केव्हां केव्हां बादशाही सैन्यावर हल्ले करीत असे व फार त्रास देत असे. सवाई जयसिंगाने त्यावर पुष्कळ स्वान्या केल्या व शेवटीं सय्यद बंधूंच्या कारकीर्दीत त्याने त्याचा भाऊ बदनसिंग (Badansingh ) ह्यास