पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ता. फाल्गुन वद्य सतमी भोमवार कुच प्रां गांधळी मुकाम नजीक धरणगांव परगणे येरंडोल प्रांां खानदेश स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असे विशेष. उत्तरेकडील वर्तमान तरी तोहमास्तकुलीखान लाहोर घेऊन पुढें आलियावरी महमदशा पातशहा याच्या व त्याच्या फौजांत दोन तीन लढाया जहाल्या. एक लढाई मातबर जाहली. हे वर्तमान राजश्री बाबूराव मल्हारी यांणीं छ० २१ जिल्कादीचें लिहून पाठ- बिलें कीं, “कजलबाशात व खानदौरा यांत युद्ध जाहलें; युद्धप्रसंगीं सादतखान जिवंत धरून नेला; खानदौरास दोन जखमा भारी होत्या; तोही गोटास येऊन मृत्यु पावला; यादगारखान व आण- खी कितेक मातबर मेले; सात आठ हजार माणूस रणास आले; लढाई बिघडून गेली; आंव कोणांत राहिला नाहीं; कचरदेखान व नि- जामउल्मुलुक, तोहमास्त कुलीच्या डेन्यास गेले. भेटून महमदशाहा पातशहाची भेट ठरावून आले. तदोत्तर छ० २१ जिल्कादी पादशहा त्याच्या डेन्यास तीनसें स्वारानिशीं गेले. भेट जाहली. त्यांणीं मेजवानी - १ फाल्गुन वद्य सप्तमी भोमवारः - ता०२० मार्च इ.स. १७३९ मंगळवार. २३० २१ जिल्कादः - ता० २० फेब्रुवारी इ० स० १७३९ मंगळवार. - ३ तोहमास्त कुलीखानः – हा इराणचा सुप्रसिद्ध नादिरशहा बादशहा. ह्याचें नांव ताहमास्प कुलीखान अर्सेही आहे. त्यावरून मराठे त्यास तोहमास्त कुलीखान अर्से ह्मणत असत. हा मुळचा धनगराचा मुलगा होता, परंतु त्याचा भाग्योदय होऊन तो ता० २६ फेब्रुवारी ३० स० १७३६ मध्ये इराणचा बाद- शहा झाला. हा मोठा योद्धा होता. ह्यानें आपली धनतृष्णा तृप्त करण्याकरितां हिंदुस्थानावर ३० स० १७३९ मध्ये स्वारी केली. त्यानें दिल्लीपर्यंत येऊन दिल्लीचें सिंहासन पादाक्रांत केलें; सुमारे दोन लक्ष लोक ठार मारिले; आणि तेथून १४॥ कोटी रुपयांची लूट स्वदेशास नेली. ह्याच लुटीमध्यें दिल्लीपतीचे रत्नजडित मयूरासनही त्यानें आपलेबरोबर नेलें. हा क्रूर व महत्वाकांक्षी बादशहा ३० स० १७४७ मध्ये मारला गेला.