पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०७ र्वादपत्र पाठविले पाहिजे. बहुत काय लिहिणें, लोभ असों दिला पाहिजे हे विनंति. श्री. तीर्थरूप श्रीमंत परमहंसस्वामी स्वामींचे सेवेसी:- अपत्यें आपाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेवून शिरसाष्टांग दंडवत विज्ञापनाः—उपरी स्वामींनीं लखमोजीबराबर आशीर्वादपत्र व प्रसाद पाठविला तो पावला. पत्रिका मस्तकी वंदून परम संतोष झाला. पत्रीं आज्ञा जे, मौजे धालवली प्रांत राजापूर येथील सनद करून पाठवणें. ते आज्ञाप्रमाणें सनद पाठविली आहे. परंतु अद्याप येथील गुंता उरकत नाहीं व शिक्काही जाला नाहीं. याजकरितां सनद न पाठविली तरी स्वामी कोपातें पावतील; याजकरितां सनद पाठविली आहे. पुढें शि- काही देवणार स्वामी समर्थ आहेत. मी आज्ञांकित आहे. मीं स्वामीं- प्रति विशेष काय लिहिणें ? उदईक सेवेसी विज्ञा- (पना ) पत्र पाठवून देतों. तेथें सविस्तर लिहितों. गुरावेचें वर्तमान लिहिणें ह्मणून आज्ञा, त्यास अद्याप येथें आलें नाहीं. आलियावर सेवेसी लिहितों. काल खालून कागद आले आहेत. त्याचें वर्तमान कांहीं कळले नाहीं. क- ळलियावर सेवेसी लिहून पाठवितों. सेवेसी निवेदन होईल. हे विज्ञापना. [ लेखांक २०५] श्री. श्रीमंत तीर्थरूप परमहंस स्वामींचे सेवेसी: [ लेखांक २०४] - १ आपाजी आंगरे :- संभाजीचें टोपण नांव असावें ? - - अपत्यें आपाजी आंगरे यानें करद्वय जोडून त्रिसंध्याकाळी शिर सा० दंडवत विज्ञापना उपरी विशेष:-मौजे धालवली प्रांत राजापूर हा गांव हुजूर सनदें महाराज राजश्री छत्रपति स्वामींनीं इनाम करून धारादत्त दिला. त्याप्रमाणें आह्नीं आपले तर्फेनें स्वामींच्या पुजेच्या साहित्याबद्दल