पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२९ विले जाते. सोमाजीच्या बहुमानास मागें पुढें पाहिले झणोन आशा, तर स्वामींच्या चरणारविंदीं श्रीमंताचा अविनयभाव तिळतुल्य नाहीं. श्रीमंताजवळ सेवकलोक सेवा करितात ते स्वामींचेच सेवक आहेत व सोमाजीद्दी पदरचाच आहे. त्याचा बहुमान न्हवेसें काय आहे? स्वामींनीं कृपा करून मघ घागर १ पाठविली ती पावली. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. जंजिरेकर हवशी. * हु. [ लेखांक २४० ] आजम अकरम ब्रोंद्रबावा दाम षफकतहु. मुषफक मेहेरबान एन्तेजाद दोस्तान अज दिल एखलास सिद्दी ●

  • पंधराव्या शतकामध्ये बहामनी राज्य ज्या वेळीं स्वतंत्र झाले त्या वेळीं

दिल्लीचा संबंध कमी होऊन अविसीनियन व आफ्रिकन लोक हिंदुस्थानच्या पश्चिम भागांत जास्त शिरले. त्यांपैकीं हबशी हे होत. हबशी है नांव Arab-el-Habish ह्यावरून पडलें. ह्या लोकांचे सिद्दी असेंही दुसरें नांव आहे. सिद्दी हा सय्यद शब्दाचा अपभ्रंश आहे. हे लोक आपल्या कर्तृत्वशक्तीनें नांवलौकिकास चढले व मोंगलबादशाहीमध्ये हे मुसलमानी आरमाराचे अधिपति झाले. ह्यांच्याकडे दंडाराजपुरी व जंजिरा हीं ठाणीं असत. ह्यांची सत्ता कमी करण्याकरितां शि- वाजीच्या कारकीर्दीपासून मराठ्यांचा यत्न चालला होता. ह्यांच्या व मराठ्यांच्या अनेक वेळी झटापटी झाल्या होत्या. ह्यांनी मराठ्यांस फार त्रास दिला व त्यांच्या राज्यांतील हिंदु देवस्थानें वगैरे उदस्त केलीं. ब्रह्मद्रस्वामी चिपळुणाजवळ पर शरामीं जाऊन राहिले होते. त्यांना तेथें हबशांकडून उपद्रव पोहोंचल्यामुळे ते घांटावर आले. त्यांची योग्यता हबशांस व त्यांच्या सुभेदारांस चांगली समज- ल्यामुळे त्यांनी त्यांस स्वस्थळीं आपल्या राज्यांत नेण्याबद्दल पुष्कळ प्रयल केला. त्यांचा व हबशांचा पत्रव्यवहार फार महत्त्वाचा आहे. त्यापैकीं जे कागद उपलब्ध झाले ते येथें सादर केले आहेत. ● - १ सिद्दी संबुल:— हा सिद्दी सुरूर ह्याचा गुलाम होता. हा इ० स० १७३४ ३५ मध्ये जंजिन्याचा अधिपति होता असा उल्लेख सांपडतो.