पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ आणि पुढेही आपण या घराण्यावर अधिक लोभ व स्नेह राखावा हैं आपणास योग्य असोन, पत्रद्वाराही समाचार घेण्यास स्मरण होत नाहीं; हें थोर लोकांस चांगले नव्हे. निरंतर स्नेहाचे उत्तमपणाची चाल राखून मित्रतेचे मार्ग दिवसानुदिवस अधिक होय तें केले पाहिजे. यानंतर आपण दहीबारा वर्षे आपला पूर्वीचा ठिकाणा सोडून घांटावर जाऊन राहिलां. वरची फौज खालीं उतरोन सर्व मुलूख खराब जा- हला. आज पावेतों गोर गरीब अद्यापि भकलेले आहेत. या गोष्टीचें भय (?) आपले सेवकांस कांहींच येत नाहीं हें आश्चर्य आहे. आपण आपले जाग्यास परशराम येऊन पूर्वीप्रमाणें वस्ती केल्यास ते प्रांतीचे लोकही आपले ठिकाणचे ठिकाणीं येऊन निर्भयपणें वस्ती करून सुख पावतील येर्णेकरून आपणासही थोर श्रेय आहे. याजकरितां पूर्वी शेख महमदअल्ली याचेबरावर आपणास लिहून पाठविलें होतें, परंतु उत्तर येऊन पोंचलें नाहीं. सांप्रत शहामत व अवलीयत बेत सिद्दी याकूत सुभेदार सुभा मामले दाभोळ व प्रांत राजापूर यांणीं पूर्वी- प्रमाणें आपले इनामगांवच्या सनदा व पन्नास बैलांचें दस्तक देण्या- करितां लिहून पाठविलें. त्याजवरून आपले वृत्तीवर व खात्रीवर दृष्टि देऊन पूर्वीप्रमाणें पेढे तर्फ चिपळूण व मोजे आंबडस तर्फ खेड दोनी गांवचे इनामाच्या सनदा व पन्नास बैलांचे दस्तक असे तयार करून पाठविले, ते कागद सुभेदार मशारनिल्हे हे आपणाकडे पाठवितील. तर आपले खातरजमेनें आपले पूर्व ठिकाणास यावयाचें करून पूर्व- १ ह्यांत स्वामी परशरामाहून निघाल्यास १०।१२ वर्षे झाली असा उल्लेख आहे आणि शेवटी २६ जुलूस सन आहे, तो लेखांक २४१ च्या शेवटच्या २१ जुलूस सनापेक्षां पांच वर्षांनीं अधिक आहे व त्या पत्रांत स्वामी वरघांटीं गे- ल्यास ५ वर्षे झाली असा उल्लेख आहे. त्यावरून हे पत्र इ० स० १७३८ सालचें असावें. ह्या वेळीं सिद्दी अबदुल रहिमान हा जंजिऱ्याचा अधिपति असावा.