पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६३ [ लेखांक २८० ] श्रीभार्गवराम. सहस्रायु चिरंजीव लक्ष्मण अष्टप्रधान यांसी आज्ञा ऐसीजे:-अंजन- वेलीहून सात आठ गांवें राजपुरीजंजिरांतून तेथून सामान दारू गोळे पायवाटें आज अंजनवेलीस येतील. आणि मार्गी वाटस याची मेटें आहेत. महाडासारखे मेट, तळाघोळासारखे मेट, ऐसीं दहा मेटें आहेत. आणि चौकडून सामान न ये तेव्हां अंजनवेली जेर होऊन आपोआप टाकून पळतील. आतां माणूस मर्दाना ह्मणावा तरी बयाजी महाडकर, अंणाजी साटला, दत्ताजी विचारे ऐसे मर्दाने त्याणें मारले. धर्म जरी ह्मणावा तरी तुमचे राज्यांत कवडीचा नाहीं, आणि कारकून तुझांस लेखीत नाहींत. तुझांहून अधिक जाहले. राजा कृपाळू, चाकर बेईमान, आपली आपली घरें भरितात. अवरं- गजेब होता त्याचा धर्म जबरा चालत होता. त्याचे दुव्हाईस वाघानें उभे राहावें. तरीच चंदीचंदावर सुटले. राजा तरी महादेवाचा महा- देव जाहला. पुढे होईल कसें ? लक्ष्मणबावा ? हें कसें कामास येईल ? तरी तुझीं धननीचे कानावर घालणें आझांस कळले तेवढे लिहिलें आहे, आह्नीं घडर्डी घडीं हे थोर लोकांस लिहों ना ! , [ लेखांक २८१ ] श्रीभार्गवराम. सहस्रायु चिरंजीव विजयीभव. वेडा गोसावी तुमचे कुळीं भार्गवें अवतार घेतला. हणमंतासारिखें यश तुझांस आलें. पुढेही श्री अहद रामेश्वर तहद दिल्ली यश देईल. तुझीं वर्तमान लिहिलें व चिरंजीव बाजीरायाची पत्रे आलीं हैं संतोषाचें वर्तमान ऐकोन, जैसी हणमंताचे गळां रघुवीरें रत्नांची माळ घातली तैसीं यशाचीं पत्रे पाठविलीं. तुझी रामरूप जाहलें. मी तुमचा जागली. कैलासवासी नानाबाबत नकद रुपये साडेतीन हजार यास व्याजबट्टा नाहीं. पहा, पहा, माझे थोरपण ! तुमचे घरांत द्रव्य व तपही घातलें, व यशही घातलें. तर